शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरता येईल व्हाट्सअ‍ॅप; कंपनीने केली नव्या फीचर्सची घोषणा 

By सिद्धेश जाधव | Published: June 04, 2021 12:58 PM

WhatsApp Multi Device Feature: व्हाट्सअ‍ॅपवर लवकरच Multi Device Support म्हणजे एकाच वेळी अनेक फोन्समधून व्हाट्सअ‍ॅप वापरण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

लोकप्रिय WhatsApp मेसेंजर नेहमीच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन घेऊन येत असतो. परंतु, काही फीचर्स अजूनही व्हाट्सअ‍ॅपवर उपलब्ध नाहीत आणि त्यांची मागणी युजर्स वारंवार करत असतात. यातील एक फिचर म्हणजे एकाचवेळी अनेक फोन्समधून अ‍ॅपचा वापर करता येणे. परंतु, आता आपल्या युजर्सची गरज ओळखून व्हाट्सअ‍ॅपने इशारा केला आहे कि कंपनी लवकरच Multi Device Support घेऊन येईल. त्याचबरोबर Disappearing Mode आणि View Once हे फीचर देखील WhatsApp मध्ये सामील होतील. 

व्हाट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचर्सची माहिती WABetaInfo वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. या वेबसाइटने WhatsApp CEO Will Cathcart यांच्यासोबत संवाद साधला होता तेव्हा या आगामी फीचर्सची माहिती समोर आली. कंपनीच्या सीईओनी सांगितले कि, व्हाट्सअ‍ॅप Multi Device Support, Disappearing Mode आणि View Once हे फीचर लवकरच रोलआउट केले जातील.  

मल्टी डिवाइस सपोर्ट फिचर (Multi-Device Support Feature) 

एकच व्हाट्सअ‍ॅप नंबर अनेक फोन्समध्ये वापरता यावा अशी अनेकांची मागणी होती. Multi Device Support फीचरच्या माध्यमातून हि मागणी पूर्ण होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार युजर त्यांचे व्हाट्सअ‍ॅप अकाउंट को एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरू शकतील. यापूर्वी एका स्मार्टफोनमधील व्हाट्सअ‍ॅप नंबरने दुसऱ्या फोनमध्ये लॉगिन केल्यावर जुन्या फोनवरील अकॉउंट बंद होत असे. एकापेक्षा जास्त फोन्स वापरणाऱ्या लोकांसाठी हे फिचर वरदान ठरणार आहे.  

डिसअपेरिंग मोड फिचर (Disappearing Mode Feature) 

Instagram वापरणाऱ्या लोकांना डिसअपेरिंग फीचरची माहिती असेलच. या फीचर अंतगर्त ठरविक वेळेत एखाद्या व्यक्तीला पाठवण्यात आलेले मेसेजेस आपोआप गायब होतात. हे फीचर आता लवकरच व्हाट्सअ‍ॅप युजर्सना पण मिळणार आहे. 

व्यू वन्स फिचर (View Once Feature) 

व्हाट्सअ‍ॅप व्यू वन्स फीचर देखील लवकरच रोलआउट होऊ शकते. या फिचरमध्ये पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ मेसेज मिळवणारा व्यक्ती फक्त एकदाच बघू शकतो. त्यानंतर तो फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा बघता येत नाही. या फिचरविषयी अधिक माहिती समोर आली नाही.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपAndroidअँड्रॉईडMessengerमेसेंजर