WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:48 IST2025-12-23T12:44:37+5:302025-12-23T12:48:06+5:30
Whatsapp Hacked: व्हॉट्सॲपचा वापर करणाऱ्यांसाठी सरकारने अलर्ट दिला आहे. सायबर गुन्हेगार आता नव्या पद्धतीने व्हॉट्सॲप हॅक करत असून, त्यांना सगळ्या गोष्टी कळत असल्याचे म्हटले आहे.

WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
देशातील कोट्यवधी व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणाऱ्या संस्थेने सावधगिरीचा इशारा दिला आहे. नवीन पद्धतीने व्हॉट्सॲप हॅक करण्याबद्दल हा इशारा दिला गेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातंर्गत काम करणाऱ्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) याबद्दल माहिती दिली आहे.
CERT-In ने म्हटले आहे की, हा धोका GhostPairing मुळे होत आहे. यामध्ये हॅकर्स अतिशय हुशारीने व्हॉट्सॲपचे अकाऊंट टेकओव्हर करतात. म्हणजे एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये त्याचे व्हॉट्सॲप सुरू असले तरी ते हॅकरकडेही सुरू होतं. त्याचा ताबा हॅकर घेतात.
केंद्रीय संस्थेने म्हटले आहे की, डिव्हाइस लिंकिंग फीचरचा गैरवापर करून हॅकर हे करत आहेत. कोणत्याही ऑथेंटिकेशन पेअरिंग कोडशिवाय अकाऊंट हॅक केले जात आहे. यातील धोकादायक बाब म्हणजे हॅकरला व्हॉट्सॲपचा रिअल टाइम चॅटिंग दिसतात. म्हणजे एखादा व्यक्ती कुणाला मेसेज पाठवत असेल, तर तेही हॅकरला दिसते.
CERT-In has published Advisory on its website.
— CERT-In (@IndianCERT) December 19, 2025
WhatsApp Account takeover campaign (GhostPairing)https://t.co/s8f11XbJY1
व्हॉट्सॲप हॅक कसं करतात?
संस्थेने सांगितले की, व्हॉट्सॲप हॅक करण्याची सुरूवात एका मेसेजपासून होते. व्यक्तीला ओळखीच्या व्यक्तीच्या नंबरवरून एक मेसेज पाठवला जातो. Hi check This Photo (कृपया हा फोटो बघा). मेसेजमध्ये एक लिंकही असते, त्यात फेसबुकसारखी सारखा फोटो दिसतो.
जेव्हा व्यक्ती हा फोटो बघण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच मोबाईल नंबर मागितला जातो. त्यानंतर व्हेरिफिकेशन करण्यासाठी सांगितले जाते. त्यानंतर व्यक्तीचे व्हॉट्सॲप हॅक केले जाते.
व्हॉट्सॲप हॅक होऊ नये म्हणून काय कराल?
जर तुम्हाला कुठल्या ओळखीच्या व्यक्तीच्या नंबरवरून मेसेज आला. त्याने मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करायला सांगितले तर लगेच अलर्ट व्हा. त्या व्यक्तीकडून पाठवण्यात आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. मोबाईल नंबरही व्हेरिफाय करू नका, तसे केले तर तुमचे व्हॉट्सॲप हॅक होऊ शकते.
तुमचे व्हॉट्सॲप अकाऊंट दुसऱ्या कुठल्या व्यक्तीकडे सुरू आहे का, हेही तपासून घेत जा. त्यासाठी व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये लिंक्ड डिव्हाइस असा पर्याय आहे. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप अकाऊंट कुठे कुठे सुरू आहे, हे कळू शकेल.