WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:11 IST2025-05-02T14:10:55+5:302025-05-02T14:11:18+5:30
WhatsApp : आता तुम्ही WhatsApp वेब क्लायंटवरून थेट व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करू शकाल. WhatsApp वेबवर चॅट करण्याची सुविधा होती पण कॉलिंग किंवा व्हिडिओ कॉलिंगची सुविधा नव्हती.

WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
WhatsApp ने आपल्या युजर्सना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. आता तुम्ही WhatsApp वेब क्लायंटवरून थेट व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करू शकाल. WhatsApp वेबवर चॅट करण्याची सुविधा होती पण कॉलिंग किंवा व्हिडिओ कॉलिंगची सुविधा नव्हती. यासाठी तुम्हाला WhatsApp च्या विंडोज किंवा मॅक एपची मदत घ्यावी लागत होती, परंतु आता सर्व कॉलिंग फीचर्स WhatsApp वेबवर देखील उपलब्ध असतील.
WhatsApp अपडेट ट्रॅकर WABetaInfo नुसार, WhatsApp त्यांच्या वेब क्लायंटच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये या नवीन फीचरचं टेस्टिंग केलं जात आहे. याचा अर्थ असा की हे फीचर येत्या काही आठवड्यात सर्व युजर्ससाठी उपलब्ध होईल.
काय असणार नवीन?
नवीन अपडेटनंतर, व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करण्यासाठी व्हॉइस वेबवर फोन आणि कॅमेरा आयकॉन दिसतील, जे सध्या व्हॉइस एपवर उपलब्ध आहेत. हे आयकॉन चॅटच्या नावाजवळ उजव्या बाजूला दिसतील. यामुळे, युजर्सना हे कॉलिंग फीचर एप इतकं सोपं आणि सुलभ वाटेल.
आता, तुम्ही तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपवरील ब्राउझरवरून थेट व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करू शकाल. यासाठी तुम्हाला WhatsApp डेस्कटॉप एप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. हे फीचर क्रोम, सफारी आणि एज सारख्या सर्व प्रमुख ब्राउझरवर काम करेल.
हे फीचर खास का आहे?
हे फीचर युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, कारण आता ते एप इन्स्टॉल न करता थेट त्यांच्या ब्राउझरवरून कॉल करू शकतील. विशेषतः जे युजर्स ऑफिसच्या कामासाठी दररोज ब्राउझरवर WhatsApp वापरत आहेत.
WhatsApp ने आणखी एक नवीन फीचर 'अॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी' सादर केले आहे. या फीचरअंतर्गत, युजर्सना आता फोनवर चॅट्स एक्सपोर्ट करण्यापासून किंवा मीडिया ऑटो-डाउनलोड करण्यापासून रोखलं जाईल. याशिवाय मेटा एआयला चॅटमध्ये मेन्शन करणं किंवा त्याला प्रश्न विचारणं यापुढे शक्य होणार नाही.