आता Google Pay ला टक्कर देणार WhatsApp Pay; लवकरच भारतात होणार लाँच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 14:46 IST2019-07-25T14:46:01+5:302019-07-25T14:46:26+5:30
व्हॉट्सअॅप कंपनी भारतात WhatsApp Business वर जास्त लक्ष केंद्रीत करत आहे.

आता Google Pay ला टक्कर देणार WhatsApp Pay; लवकरच भारतात होणार लाँच!
नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे ग्लोबल हेड विल कॅथकार्ट (Will Cathcart) भारतात आले आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात व्हॉट्सअॅपचे ग्लोबल हेड विल कॅथकार्ट आणि नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्थित होते. या कार्यक्रमात व्हॉट्सअॅप भारतात कशाप्रकारे लोकांना कनेक्ट करत आहे, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याशिवाय WhatsApp Business च्या कामगिरीबद्दलही सांगण्यात आहे.
WhatsApp Business च्या संदर्भात विल कॅथकार्ट यांनी सांगितले की, भारतात WhatsApp Business मोठ्या प्रमाण वाढत आहे. लहान व्यवसाय व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहचत आहेत. तसेच, वर्ष अखेरीस WhatsApp Payment सुरु करण्यात येईल, असेही विल कॅथकार्ट यांनी सांगितले.
याचबरोबर, आम्ही WhatsApp Pay चे भारतात स्वागत करतो. व्हॉट्सअॅप कंपनी अनेक वर्षांपासून भारतात रेग्युलेशनसोबत संघर्ष करत आहे. व्हॉट्सअॅपचे भारतात सर्वाधिक जास्त युजर्स आहेत. कंपनीने याठिकाणी WhatsApp Pay सुरु केले पाहिजे. याचा वापर अनेक लोक करतील कारण यामुळे व्यवहार करणे सोपे होईल, असे नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या कार्यक्रमावरुन असे समजते की, व्हॉट्सअॅप कंपनी भारतात WhatsApp Business वर जास्त लक्ष केंद्रीत करत आहे. या कार्यक्रमात अनेक छोट्या उद्योगांच्या प्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी व्हॉट्सअॅप कशाप्रकारे त्यांच्या उद्योगासाठी मदत करणार आहे, याबाबत माहिती देण्यात आली.