WhatsApp Down: साडेबारा वाजल्यापासून व्हॉट्सअॅपचे वाजले बारा; मेसेज जाईनात की येईनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 13:02 IST2022-10-25T13:01:58+5:302022-10-25T13:02:17+5:30
WhatsApp Down: काही वेळातच #whatsappdown हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे.

WhatsApp Down: साडेबारा वाजल्यापासून व्हॉट्सअॅपचे वाजले बारा; मेसेज जाईनात की येईनात
दिवाळीच्या दिवशी करोडो मेसेजची आदान प्रदान करणारे व्हॉट्सअॅप दुसऱ्या दिवशी डाऊन झाले आहे. साडे बारा वाजल्यापासून Whats App बंद पडल्याने युजर्स त्रस्त झाले आहेत.
Whatsapp is down a day after Diwali. Looks like people finally found the time to respond to Diwali wishes(enmasse)!
— Anshu Chhibber (@AnshuChhibber) October 25, 2022
साडे बारा वाजल्यापासून कोणाला मेसेज जात नाहीएत की कोणाला येत नाहीएत. यानंतर काही वेळातच #whatsappdown हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. याचे कारण समजू शकलेले नाही. मेटा प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला माहिती आहे की सध्या काही लोकांना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत. कंपनी 'शक्य तितक्या लवकर' सेवा रिस्टोअर करण्यासाठी काम करत आहे. जगभरात Whatsapp ला समस्या येत आहे.