व्हॉट्सॲप कॉलिंगमध्ये मोठा बदल होणार!अनेक गोष्टी नवीन मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:12 IST2026-03-18T16:02:55+5:302026-03-18T16:12:17+5:30

कॉलिंगचा अनुभव सुधारण्यासाठी व्हॉट्सॲप लवकरच एक नवीन नॉईज कॅन्सलेशन फीचर आणत आहे. हे फीचर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल दरम्यान पार्श्वभूमीतील आवाज फिल्टर करेल, यामुळे आवाज अधिक स्पष्ट येईल.

WhatsApp calling will undergo a major change! Many new features will be available. | व्हॉट्सॲप कॉलिंगमध्ये मोठा बदल होणार!अनेक गोष्टी नवीन मिळणार

व्हॉट्सॲप कॉलिंगमध्ये मोठा बदल होणार!अनेक गोष्टी नवीन मिळणार

जर तुम्ही मेसेजिंग तसेच कॉलिंगसाठी दररोज व्हॉट्सॲप वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म 'मेटा'वर लवकरच एक नवीन फीचर येत आहे. हे वापरकर्त्यांना व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल दरम्यान नॉइज कॅन्सलेशन चालू करण्याची सुविधा देईल. हे नवीन फीचर मागील आवाज आपोआप फिल्टर करून व्हॉइस कॉल अधिक स्पष्ट करेल.

सांगलीत जयंत पाटलांनी पुन्हा एकदा केला 'करेक्ट कार्यक्रम'! भाजपला धोबीपछाड देत जिल्हा परिषदेवर मविआचा झेंडा

व्हॉट्सॲप गेल्या काही काळापासून कॉलिंगचा अनुभव सातत्याने सुधारत आहे आणि हे बदल केवळ व्हॉट्सॲप वेबवरच नव्हे, तर अँड्रॉइड आणि आयओएस ॲप्सवरही येत आहेत. याच संदर्भात, कंपनीने आता कॉलची एकूण गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन फीचर जोडले आहे.

अँड्रॉइड २.२६.११.८ च्या नवीनतम बीटा व्हर्जननंतर व्हॉट्सॲपमध्ये एक अंगभूत नॉईज कॅन्सलेशन फीचर आढळून आले आहे. ही माहिती व्हॉट्सॲप ट्रॅकिंग वेबसाइट WABetaInfo ने देखील दिली आहे. चाचणीनंतर कंपनी हे फीचर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध करून देऊ शकते.

नॉईज कॅन्सलेशन फीचर कसे काम करते?

नॉईज कॅन्सलेशन हे एक जबरदस्त तंत्रज्ञान आहे. याद्वारे रहदारी, वारा किंवा जवळपासची संभाषणे यांसारखे मागील आवाज कमी करते. हे वापरकर्त्याच्या आवाजावर लक्ष केंद्रित करून आणि ANC इअरफोन्सप्रमाणेच, इतर आवाज रिअल-टाइममध्ये काढून टाकून काम करते. यामुळे गोंगाटाच्या वातावरणातही कॉल अधिक स्पष्ट ऐकू येण्यास मदत होते.

सध्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म अँड्रॉइडवर नॉईज कॅन्सलेशन उपलब्ध नाही. आयफोन आणि आयपॅडवर व्हॉइस आयसोलेशन माइक मॉडेल्स देते.

Web Title : व्हाट्सएप कॉलिंग में बड़ा बदलाव: अब मिलेगा नॉइज कैंसलेशन!

Web Summary : व्हाट्सएप एंड्रॉइड और आईओएस पर वॉयस और वीडियो कॉल के लिए नॉइज कैंसलेशन फीचर पेश कर रहा है। यह फीचर बैकग्राउंड शोर को फिल्टर करता है, जिससे कॉल स्पष्ट होती है। वर्तमान में बीटा टेस्टिंग में, यह शोरगुल वाले वातावरण में भी स्पष्ट कॉल का वादा करता है, जिससे उपयोगकर्ताओं के लिए कॉलिंग का अनुभव बेहतर होगा।

Web Title : WhatsApp Calling to Get a Big Upgrade: New Noise Cancellation!

Web Summary : WhatsApp is introducing a noise cancellation feature for voice and video calls on Android and iOS. This feature filters background noise, enhancing call clarity. Currently in beta testing, it promises clearer calls even in noisy environments, improving the overall calling experience for users.