शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
2
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
3
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
4
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
5
कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
6
क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा
7
हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश, प्रमाण वाढवण्याची मागणी
8
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
9
Nagpur Crime: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
10
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू; ३२ भाविक बेपत्ता 
11
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
12
रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा
13
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
14
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
15
बँक फसवणुकीचा आरोपी व्यावसायिक बनून होता लपून, नऊ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या 
16
ट्रम्पना इतर देशांवर टॅरिफ आकारण्याचा अधिकार नाही
17
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
18
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
19
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
20
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट

Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 14:53 IST

Vivo X200 FE 5G Launched: स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने त्यांचा नवा स्मार्टफोन विवो एक्स २०० एफई 5G बाजारात लॉन्च केला.

स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने त्यांचा नवा स्मार्टफोनविवो एक्स २०० एफई 5G बाजारात लॉन्च केला. हा फोन काही दिवसांपूर्वी तैवानमध्ये सादर करण्यात आला होता.  या फोनमध्ये ६ हजार ५०० एमएएच क्षमता असलेली दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा मिळत आहे. हा फोन थेट अॅपल, सॅमसंग आणि गुगल सारख्या ब्रँडच्या फ्लॅगशिप फोनशी स्पर्धा करेल, असा कंपनीचा दावा आहे. शिवाय, कंपनीने त्यांचा फोल्डेबल फोन विवो एक्स फोल्ड ५ देखील लॉन्च केला आहे.

विवो एक्स २०० एफई 5G हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये (१२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज/ १६ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज) लॉन्च करण्यात आला. या फोनची सुरुवाती किंमत ५४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर, टॉप व्हेरिएंट ५९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येईल. या फोनची पहिली विक्री २३ जुलै रोजी सुरू होईल. ग्राहक ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सवरून हा फोन खरेदी करू शकतात. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना ६,००० रुपयांची सूट दिली जाणार आहे.

विवो एक्स २०० एफई 5G: डिस्प्लेविवो एक्स २०० एफई 5G मध्ये  ६.३१-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १२०Hz हाय रिफ्रेश रेट फीचरला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राईटनेस ५००० निट्स इतकी आहे. हा फोन MediaTek Dimensity ९३००+ प्रोसेसरवर काम करतो. 

विवो एक्स २०० एफई 5G: कॅमेराया फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, ५० मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा- वाइड कॅमेऱ्याचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

विवो एक्स २०० एफई 5G: बॅटरीविवो एक्स २०० एफई 5G मध्ये ६ हजार ५०० एमएएच क्षमता असलेली दमदार बॅटरी असेल, जी ९० वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. त्यामुळे हा फोन लवकर चार्ज होईल आणि वापरकर्त्यांचा वेळ वाचवेल.

विवो एक्स २०० एफई 5G: कनेक्टिव्हिटीया विवो फोनमध्ये ड्युअल ५जी सिम कार्ड, ब्लूटूथ ५.४, एनएफसी, यूएसबी टाइप सी सारखे फीचर्स आहेत. हा फोन ईसिम आणि फिजिकल सिम कार्ड सपोर्टसह येतो.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनVivoविवो