शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Vivo ने चालवले 5G स्लीमट्रीमचे चक्कर; V20 Pro लाँच करत दिली OnePlus, Moto ला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 3:20 PM

Vivo V20 Pro 5G launched: Vivo V20 Pro चे एकच व्हेरिअंट कंपनीने लाँच केले आहे. हा फोन ऑनलाईन, ऑफलाईन रिटेल स्टोअरवर खरेदी करता येणार आहे. ऑफरनुसार युजरला १० टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. यासाठी ICICI बँकेचे कार्ड असणे गरजेचे आहे. 

चीनची आणखी एक कंपनी व्हिवोने भारतात पहिला 5G फोन लाँच केला आहे. Vivo V20 Pro चे डिझाईन प्रिमिअम ठेवण्यात आले असून दोन सेल्फी कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोनची किंमत 29,990 रुपये ठेवण्यात आली आहे. Vivo V20 Pro चे एकच व्हेरिअंट कंपनीने लाँच केले आहे. हा फोन ऑनलाईन, ऑफलाईन रिटेल स्टोअरवर खरेदी करता येणार आहे. ऑफरनुसार युजरला १० टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. यासाठी ICICI बँकेचे कार्ड असणे गरजेचे आहे. 

स्पेसिफिकेशन आणि फिचर्सVivo V20 Pro मध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही सर्वात स्लीम 5जी स्मार्टफोन आहे. याची जाडी 7.39mm आहे. हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 765G प्रोसेसर  देण्यात आला आहे. तसेच 8 जीबी रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्येच अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. 

Xiaomi भल्याभल्यांना रडवणार! Redmi Note 9 5G स्मार्टफोन 15000 रुपयांत लाँच

या किंमतीत सध्या हाय रिफ्रेशरेट दिला जात आहे. मात्र, व्हिवोने हे टाळले आहे. डिस्प्ले हा 60Hz च्या रिफ्रेश रेट असलेलाच ठेवण्यात आला आहे. यामुळे स्मूथ व्हिडीओ, गेम पाहणे कठीण जाणार आहे. या बदल्यात व्हिवोने हा फोन अधिकाधिक प्रिमिअम कसा दिसेल यावर लक्ष दिले आहे. 

कॅमेरा Vivo V20 Pro मध्ये तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फीसाठी दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. रिअरला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, दुसरा 8 मेगापिक्सल आणि तिसरा 2 मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी 44 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि दुसरा 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 4,000 mAh ची असून 33W फ़ास्ट चार्ज सपोर्ट करते. 

आधीच दोन 5G फोन बाजारात

Moto G 5G हा फोन ७ डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 6.7 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन पहिला युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आल्याने चांगलेच प्राईस वॉर रंगणार आहे. Moto G 5G च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर वनप्लसचा स्वस्त  5 जी फोन 25999 रुपयांपासून सुरु होतो. परंतू लाँच झाल्यापासून 27999 रुपयांचे व्हेरिअंटच उपलब्ध आहे. 

टॅग्स :VivoविवोOneplus mobileवनप्लस मोबाईलMotorolaमोटोरोलाchinaचीन