Xiaomi's brand Redmi Note 9 5G smartphone launched at Rs 15000 | Xiaomi भल्याभल्यांना रडवणार! Redmi Note 9 5G स्मार्टफोन 15000 रुपयांत लाँच

Xiaomi भल्याभल्यांना रडवणार! Redmi Note 9 5G स्मार्टफोन 15000 रुपयांत लाँच

चीनची तगडी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ही वनप्लस, अॅपलसारख्या भल्याभल्या कंपन्यांना रडवणार आहे. शाओमीचा ब्रँड रेडमीने Redmi Note 9 5G चे दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. याची किंमत पाहूनच स्वस्तात 5जी फोनची सुरुवात करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांत मोटरोलाही स्वस्तातील ५जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. 


रेडमीने चीनमध्ये  Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G हे दोन ५जी फोन लाँच केले आहेत. तर Redmi Note 9 4G हा फोनही लाँच केला आहे. Redmi Note 9 5G च्या 6GB RAM + 128GB व्हेरिअंटची किंमत 1299 Yuan म्हणजेच 14573.90 रुपये एवढी कमी आहे. तर Redmi Note 9 Pro 5G ची किंमत 1599 Yuan म्हणजेच 17,944.19 रुपये ठेवण्यात आली आहे. भारतीय बाजारातील किंमतीचा विचार केल्यास ती 15 ते 20 हजाराच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. 


Redmi Note 9 5G च्या 8 GB RAM + 128GB व्हेरिअंटची किंमत 1550 Yuan म्हणजे 16,818.53 रुपये तर 8 GB RAM + 256 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1699 yuan म्हणजे 19,063 रुपये ठेवण्यात आली आहे.  Redmi Note 9 Pro 5G चे देखील रेडमीने तीन व्हेरिअंट लाँच केले आहेत. यामध्ये 6 GB RAM + 128 GB व्हेरिअंटची किंमत 16,818 रुपये. 8 GB RAM + 128 GB व्हेरिअंटची किंमत 20,187 रुपये आणि 8 GB RAM + 256 GB व्हेरिअंटची किंमत 22,428 रुपये ठेवण्यात आली आहे. 


Redmi Note 9 5G मध्ये काय़ काय? 
रेडमीचे हे नवीन फोन जगातील स्वस्त ५जी स्मार्टफोन आहेत. सध्या वनप्लसकडेच 25 ते 29000 च्या किंमतीतला ५जी फोन आहे. तर मोटरोला येत्या 30 नोव्हेंबरला भारतात स्वस्त ५जी फोन लाँच करणार आहे. यामुळे चिनी कंपन्यांमध्येच मोठे किंमत युद्ध रंगणार आहे. Redmi Note 9 5G मध्ये MediaTek Dimensity 800U प्रोसेसर देण्यात आला आहे. 6.53 इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले,  13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, 48-8-2 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 5000 एमएएचची बॅटरी जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. 

Web Title: Xiaomi's brand Redmi Note 9 5G smartphone launched at Rs 15000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.