Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:04 IST2025-10-06T11:03:49+5:302025-10-06T11:04:59+5:30

एका व्यक्तीने फ्लिपकार्टवरून आयफोन १६ खरेदी केला आणि बॉक्स उघडताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

Video flipkart iphone 16 viral post samsung | Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल नुकताच संपला आहे. कंपनीने अनेक सर्वोत्तम डील आणि ऑफर्स दिल्याचा दावा केला. या सेलदरम्यान अनेकांनी बंपर खरेदी केली. एका व्यक्तीने फ्लिपकार्टवरून आयफोन १६ खरेदी केला आणि बॉक्स उघडताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. बॉक्समध्ये असं काही होतं जे पाहून त्याला मोठा धक्काच बसला.

@bharaths028 नावाच्या एका अकाउंट होल्डरने X प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली, जी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. पोस्टमध्ये या व्यक्तीने म्हटलं की, सेल दरम्यान त्याने आयफोन १६ ऑर्डर केला. डिलिव्हरी बॉयला बॉक्स उघडण्यास सांगितल्यानंतर तो हैराण झाला. कारण बॉक्स उघडल्यानंतर आतमध्ये आयफोनऐवजी एक सॅमसंगचा स्मार्टफोन सापडला.

फ्लिपकार्टने पोस्टवर रिप्लाय दिला. फ्लिपकार्टने सर्वात आधी युजरची माफी मागितली आणि नंतर युजरला त्यांच्या ऑर्डरचे डिटेल्स पाठवण्यास सांगितलं. ही समस्या सोडवली गेली आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सेल दरम्यान आयफोनवर बंपर ऑफर्सची घोषणा केली. या सेल दरम्यान, आयफोन १६ ₹६०,००० पेक्षा कमी किमतीत लिस्टेड होता, तर गेल्या वर्षी हा हँडसेट ₹७९,९९० च्या सुरुवातीच्या किमतीत लिस्टेड होता. या सेल दरम्यान आयफोन १५ आणि आयफोन १४ देखील सवलतीच्या किमतीत विकले जात होते.

Web Title : आईफोन 16 का ऑर्डर गड़बड़: ग्राहक को मिला सैमसंग फोन!

Web Summary : फ्लिपकार्ट के बिग बिलियन डेज़ सेल में एक ग्राहक के साथ धोखा हुआ। आईफोन 16 के बजाय, उन्हें सैमसंग फोन मिला। यूजर ने एक्स पर पोस्ट किया, जिसके बाद फ्लिपकार्ट ने माफी मांगी और ऑर्डर विवरण मांगा। यह घटना वायरल हो गई है।

Web Title : iPhone 16 Order Fiasco: Customer Receives Samsung Phone Instead!

Web Summary : Flipkart's Big Billion Days sale went wrong for one customer. Instead of an iPhone 16, they received a Samsung phone. The user posted about the mix-up on X, prompting Flipkart to apologize and request order details. The incident has gone viral.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.