एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:48 IST2026-01-14T15:47:48+5:302026-01-14T15:48:15+5:30
कंटेट क्रिएटर्स आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर; कोणते फिचर्स मिळतील? जाणून घ्या...

एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
Apple ने आपल्या सर्व्हिसेस धोरणाला अधिक बळकटी देण्यासाठी Creator Studio नावाचे नवे सब्सक्रिप्शन लॉन्च केले आहे. कंटेंट क्रिएटर्स, विद्यार्थी आणि प्रोफेशनल्सच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या पॅकेजमध्ये व्हिडिओ, म्युझिक आणि डिझायनिंगसाठी AI-पावर्ड प्रो-लेव्हल टूल्स देण्यात आले आहेत. हे सब्सक्रिप्शन २८ जानेवारीपासून App Store वर उपलब्ध होणार आहे.
एक सब्सक्रिप्शन, अनेक प्रो टूल्स
Apple Creator Studio हे सब्सक्रिप्शन दरमहा १२.९९ डॉलर किंवा वार्षिक १२९ डॉलर्स या दरात उपलब्ध होणार आहे. या एका पॅकेजमध्ये Apple चे लोकप्रिय क्रिएटिव्ह सॉफ्टवेअर्स व्हिडिओ एडिटिंग, म्युझिक प्रॉडक्शन आणि डिझायनिंगसाठी वापरले जाणारे प्रो टूल्स मिळतील. ही सर्व टूल्स Mac आणि iPad या दोन्ही प्लॅटफॉर्मवर चालतील. त्यामुळे क्रिएटर्सना वेगवेगळ्या सब्सक्रिप्शनचा खर्च टाळता येणार आहे. Apple चा उद्देश क्रिएटिव्ह वर्कफ्लो अधिक सोपा, वेगवान आणि किफायतशीर करणे हा आहे.
AI मुळे व्हिडिओ आणि म्युझिक एडिटिंग अधिक स्मार्ट
व्हिडिओ एडिटिंगसाठी आता ट्रान्सक्रिप्ट-बेस्ड सर्च, व्हिज्युअल सर्च आणि बीट डिटेक्शन यांसारखी AI वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यामुळे मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये हव्या त्या क्लिप्स पटकन शोधणे आणि एडिटिंगचा वेळ कमी करणे शक्य होणार आहे. म्युझिक प्रॉडक्शनमध्येही Synth Player, Chord ID यांसारखी AI टूल्स जोडली गेली आहेत, ज्यामुळे म्युझिक प्रोडक्शन अधिक सुलभ आणि क्रिएटिव्ह होईल.
iPad वर पहिल्यांदाच प्रो-लेव्हल डिझाइनिंग
डिझाइन आणि फोटो एडिटिंगसाठी ओळखले जाणारे Pixelmator Pro अॅप पहिल्यांदाच iPad वर उपलब्ध होत आहे. हे अॅप Apple Pencil ला सपोर्ट करणार असल्याने डिझायनर्ससाठी ड्रॉइंग, रिटचिंग आणि क्रिएटिव काम अधिक अचूक आणि सहज होणार आहे. याआधी Mac पुरते मर्यादित असलेले प्रो-लेव्हल डिझाइन टूल्स आता iPad यूजर्सनाही मिळणार आहेत.
Apple च्या सर्व्हिसेस धोरणाला नवी चालना
गेल्या काही वर्षांत Apple ने म्युझिक, क्लाउड आणि इतर डिजिटल सेवांच्या माध्यमातून रिकरिंग रेव्हेन्यू मजबूत केला आहे. Creator Studio हे त्याच दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हार्डवेअर विक्रीचा वेग काहीसा मंदावलेला असताना, अशा सब्सक्रिप्शन-बेस्ड सेवांमुळे कंपनीला स्थिर आणि सातत्यपूर्ण उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.