VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:55 IST2025-12-01T16:54:30+5:302025-12-01T16:55:38+5:30
टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने अलीकडेच व्हीपीएन युजर्ससाठी एक गंभीर इशारा दिला आहे.

VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
जर तुम्ही तुमची ऑनलाइन प्रायव्हसी जपण्यासाठी VPN अर्थात व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरत असाल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने अलीकडेच व्हीपीएन युजर्ससाठी एक गंभीर इशारा दिला आहे. अनेक बनावट व्हीपीएन ॲप्सचा आधार घेऊन सायबर गुन्हेगार लोकांच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर इन्स्टॉल करत आहेत, ज्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.
खोट्या व्हीपीएन ॲप्समुळे होऊ शकते मोठे नुकसान!
गुगलच्या इशाऱ्यानुसार, सायबर क्रिमिनल्स अनेकदा प्रतिष्ठित आणि नामांकित कंपन्यांनी विकसित केल्याचा दावा करणारे बनावट व्हीपीएन ॲप्स तयार करतात. लोकांना वाटते की, हे ॲप्स त्यांची प्रायव्हसी जपण्यासाठी आहेत. परंतु एकदा ते डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल झाले की, हे ॲप्स यूजरच्या डिव्हाइसमध्ये गुपचूप मालवेअर आणि रिमोट ॲक्सेस टूल्स इन्स्टॉल करतात.
या टूल्सच्या माध्यमातून हॅकर्स वापरकर्त्यांचे मेसेजेस, ब्राउझिंग हिस्ट्री आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्रेडिटेंशियल्स जसे की बँक डिटेल्स, पासवर्ड्स चोरी करतात. यामुळे तुमचे बँक खाते एका क्षणात रिकामे होऊ शकते.
सुरक्षित राहण्यासाठी काय कराल?
गुगलने वापरकर्त्यांना या फसव्या ॲप्सपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत.
> तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेहमी Google Play Protect हे फीचर 'ऑन' ठेवा. हे फीचर मशीन लर्निंगचा वापर करून धोकादायक ॲप्स शोधते आणि बँकिंग फसवणुकीसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या ब्लॉक करते. जर, तुम्ही ब्राउझर किंवा फाइल मॅनेजरद्वारे 'साइडलोडिंग' करण्याचा प्रयत्न करत असाल, तर Play Protect ते इन्स्टॉलेशन थांबवू शकते.
> ॲप्स डाउनलोड करण्यासाठी नेहमी प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरसारख्या अधिकृत प्लॅटफॉर्मचाच वापर करा.
> कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीकडून आलेल्या लिंकवर क्लिक करून ॲप्स डाउनलोड करू नका.
> जर कोणतेही ॲप तुम्हाला Play Protect डिसेबल करण्यास सांगत असेल, तर ते ॲप अजिबात इन्स्टॉल करू नका.
> शक्य असल्यास, चीनी डेव्हलपर्सनी विकसित केलेले VPN ॲप्स डाउनलोड करणे टाळा.
गुगलसोबतच यूएस सायबर सिक्युरिटी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सीने देखील VPN ॲप्सबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.