सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 19:52 IST2026-01-12T19:52:03+5:302026-01-12T19:52:38+5:30

USB Condom Device: USB चार्जिंग स्कॅम, किंवा “जूस जॅकिंग” वेगाने वाढत आहे.

USB Condom Device to protect against cyber attacks, where and how to use it? know more | सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...

सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...

USB Condom Device: आजच्या डिजिटल युगात एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, मॉल, कॅफे अशा सार्वजनिक ठिकाणी USB चार्जिंग पॉइंट्स सहज उपलब्ध असतात. मोबाईलची बॅटरी संपली की, अनेकजण क्षणाचाही विचार न करता फोन USB पोर्टला जोडतात. मात्र, यामुळे तुम्ही सायबर गुन्ह्याचे बळी ठरू शकता.

USB चार्जिंग स्कॅम, ज्याला “जूस जॅकिंग” असेही म्हटले जाते, वेगाने वाढत असून याद्वारे बँक डिटेल्स, पासवर्ड, OTP आणि इतर वैयक्तिक माहिती चोरी होण्याचा गंभीर असतो. या सायबर हल्ल्यांपासून बचावासाठी आता USB कंडोम (USB Condom) नावाचे एक विशेष डिव्हाइस उपयुक्त ठरत आहे.

USB कंडोम म्हणजे नेमकं काय?

USB कंडोम म्हणजे एक लहान USB डेटा ब्लॉकर. हा फोन आणि सार्वजनिक चार्जिंग पोर्टच्या मध्ये जोडला जातो. याचे मुख्य काम फोनला फक्त चार्जिंग देणे आणि डेटा ट्रान्सफर पूर्णपणे बंद ठेवणे आहे. यामुळे फोन चार्ज होतो, पण कोणताही डेटा बाहेर किंवा आत ट्रान्सफर होत नाही. त्यामुळे जूस जॅकिंगसारख्या सायबर हल्ल्यांपासून संरक्षण मिळते. हे डिव्हाइस आकाराने खूप लहान असल्याने, सहज खिशात किंवा बॅगेत ठेवता येते. भारतात USB कंडोमची किंमत साधारणपणे ₹500 ते ₹1,000 दरम्यान आहे.

जूस जॅकिंग म्हणजे काय?

जूस जॅकिंग हा एक सायबर हल्ला आहे, ज्यामध्ये हॅकर्स सार्वजनिक USB पोर्ट किंवा केबलमध्ये मालवेअर इन्स्टॉल करतात. तुम्ही फोन चार्जिंगसाठी जोडताच बँक डिटेल्स, OTP, ई-मेल, पासवर्ड यासारखी संवेदनशील माहिती चोरीला जाऊ शकते. या धोक्याबाबत Reserve Bank of India (RBI) नेही नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. काही प्रकरणांमध्ये फोन पूर्णपणे लॉक होणे किंवा खात्यातील संपूर्ण बचत गमावण्याचीही वेळ येऊ शकते.

USB कंडोमचे प्रकार

बाजारात USB कंडोम मुख्यतः दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत:

1) डोंगल प्रकार

चार्जिंग केबल आणि फोनच्या मध्ये जोडला जातो. केबलवरील डेटा ट्रान्सफर फीचर ब्लॉक करतो.

2) पॉवर-ओन्ली केबल

सामान्य चार्जिंग केबलसारखीच दिसते, मात्र यामधून फक्त चार्जिंग होते, डेटा ट्रांसफर होत नाही.

सावधानी हाच सर्वोत्तम बचाव

सायबर तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक USB पोर्ट वापरणे शक्यतो टाळावे. मात्र अत्यावश्यक परिस्थितीत चार्जिंग करायचीच असेल, तर USB कंडोमसारखी डिव्हाइस वापरणे हा डिजिटल सुरक्षेसाठी शहाणपणाचा निर्णय ठरू शकतो.

Web Title : USB कंडोम से साइबर हमलों से बचाएं अपना फोन, जानिए कैसे

Web Summary : USB कंडोम सार्वजनिक चार्जिंग पोर्ट से डेटा चोरी को रोकता है। यह डिवाइस डेटा ट्रांसफर को ब्लॉक करता है, केवल चार्जिंग की अनुमति देता है, और जूस जैकिंग हमलों से पासवर्ड और बैंक विवरण जैसी संवेदनशील जानकारी की सुरक्षा करता है। ₹500-₹1,000 की कीमत पर, यह डिजिटल सुरक्षा के लिए एक समझदारी भरा निवेश है।

Web Title : Protect your phone from cyber attacks with a USB condom.

Web Summary : USB condoms prevent data theft from public charging ports. These devices block data transfer, allowing only charging, safeguarding sensitive information like passwords and bank details from juice jacking attacks. Costing ₹500-₹1,000, they're a wise investment for digital security.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.