झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:55 IST2025-12-31T13:54:54+5:302025-12-31T13:55:34+5:30
तुम्ही इंटरनेटशिवाय आणि स्मार्टफोन नसला तरीही UPI पेमेंट करू शकता.

झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
आजकल UPI पेमेंट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ऑनलाईन शॉपिंग असो किंवा किराणा मालाची खरेदी, प्रत्येक कामासाठी लोक UPI चा वापर करतात. फक्त एक पिन टाकून काही सेकंदात डिजिटल पेमेंट पूर्ण होतं. मात्र, अनेकदा कमी नेटवर्कमुळे इंटरनेट चालत नाही किंवा डेटा संपतो, अशा वेळी युजर्सची मोठी अडचण होते. जर तुम्हीही कधी अशा परिस्थितीत अडकलात, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही इंटरनेटशिवाय आणि स्मार्टफोन नसला तरीही UPI पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवरून फक्त एक खास कोड *99# डायल करावा लागेल. चला तर मग जाणून घेऊया याची संपूर्ण पद्धत.
ज्या ठिकाणी इंटरनेट नाही, तिथेही तुम्ही UPI पेमेंट करू शकता. अगदी साध्या फीचर फोनवरून (बटणचा फोन) पेमेंट करणं शक्य आहे. मात्र यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत: तुमच्या फोनला मोबाईल नेटवर्क असणे गरजेचे आहे. तुमचा जो मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक आहे, त्याच नंबरवरून तुम्ही पेमेंट करू शकता. तुमच्याकडे तुमचा UPI PIN असणे आवश्यक आहे. त्याशिवाय व्यवहार पूर्ण होणार नाही.
नंबर डायल केल्यानंतर निवडावे लागतील 'हे' पर्याय
- जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नसेल आणि तुम्हाला पैसे पाठवायचे असतील, तर खालील स्टेप्स फॉलो करा:
- सर्वात आधी फोनच्या कीपॅडमध्ये जाऊन *99# डायल करा.
- तुम्हाला तुमची भाषा निवडण्यास सांगितलं जाईल. तुम्ही हिंदी, इंग्रजी किंवा इतर प्रादेशिक भाषा निवडू शकता.
- आता तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव किंवा IFSC कोडचे पहिले ४ अंक टाकावे लागतील.
- तुमची बँक निवडा. स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांचे पालन करत पुढे जा.
- शेवटी, ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा नंबर किंवा UPI ID टाकून तुमचा UPI PIN टाका आणि पेमेंट पूर्ण करा.
- ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित आहे. यामुळे इंटरनेट नसतानाही तुमची महत्त्वाची कामे थांबणार नाहीत.