UPI Payments: अरे वा! आता Feature Phone वरून देखील करता येणार UPI पेमेंट; RBI नं केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 15:56 IST2021-12-08T15:56:33+5:302021-12-08T15:56:52+5:30
UPI Payments: eature Phone युजर्ससाठी लवकरच UPI आधारित डिजिटल पेमेंट सिस्टम लाँच होणार आहे. तसेच UPI पेमेंटची मर्यादा 2 लाखांवरून 5 लाख करण्यात आली आहे.

UPI Payments: अरे वा! आता Feature Phone वरून देखील करता येणार UPI पेमेंट; RBI नं केली मोठी घोषणा
नोटबंदीनंतर भारतात डिजिटल पेमेंट्सची संख्या वाढली. त्यानंतर कोरोना काळात देखील ऑनलाईन पेमेंटवर भर देण्यात आला. यात युपीआय आधारित पेमेंट ऍप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. आता ऑनलाईन पेमेंटची संख्या आणखीन वाढणार आहे. कारण Feature Phone युजर्ससाठी लवकरच UPI आधारित डिजिटल पेमेंट सिस्टम लाँच होणार आहे.
नव्या सिस्टमच्या मदतीनं फिचर फोन युजर्स सहज ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू शकतील. तसेच ऑन-डिवाइस वॉलेट अॅप देखील सादर करण्यात येईल, अशी माहिती RBI चे गर्वनर Shaktikanta Das यांनी दिली आहे. भारतातील फीचर फोन युजर्सना डिजिटल पेमेंट सिस्टम मध्ये सहभागी करून घेण्यासाठी हा निर्णय रिजर्व बँक ऑफ इंडियानं घेतला आहे. यासाठी लवकरच नवीन डिजिटल पेमेंट सिस्टम लाँच केली जाईल. इतकेच नव्हे तर UPI पेमेंटची मर्यादा 2 लाखांवरून 5 लाख करण्यात आली आहे.
UPI इंटरनेट ऍक्सेस असलेल्या स्मार्टफोन्सवर काम करत आहे. परंतु त्यापेक्षा जास्त लोक अजूनही फिचर फोन वापरत आहेत आणि ते सध्या आपल्या फोनवरून युपीआय ट्रँजॅक्शन करू शकत नाहीत. अशा युजर्ससाठी युपीआयमध्ये नवीन फिचर जोडण्याची आरबीआयची योजना आहे. त्यामुळे युजर USSDटेक्नॉलॉजीचा वापर करून पेमेंट करू शकतील. या पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासणार नाही आणि फक्त मेसेज पाठवून ट्रँजॅक्शन करता येईल. त्याचबरोबर युपीआय वॉलेट अॅप देखील सादर करण्यात येईल, असं देखील आरबीआयनं सांगितलं आहे. ही सिस्टम अस्तित्वात आल्यास स्ट्रॉन्ग इंटरनेट कनेक्शन नसणारी ठिकाणं देखील डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये सहभागी होऊ शकतील.