डाऊन झालेलं ट्विटरचं सर्व्हर हळूहळू पूर्वपदावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 21:15 IST2019-08-21T21:06:10+5:302019-08-21T21:15:16+5:30
सोशल मीडियावरचं सर्वात प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटरचं सर्व्हर डाऊन झालं आहे.

डाऊन झालेलं ट्विटरचं सर्व्हर हळूहळू पूर्वपदावर
नवी दिल्लीः सोशल मीडियावरचं सर्वात प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटरचं सर्व्हर डाऊन झालं आहे. परंतु कालांतरानं ते पूर्ववत झालं आहे. ट्विटर डाऊन झाल्यानं युजर्सला अडचणींचा सामना करावा लागला होता. युजर्सना ट्विट करण्यासह इतर ट्विट पाहता येत नव्हतं. ट्विट डाऊन झाल्यानंतर एखाद्या युजर्सनं ट्विट उघडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला 'Something Went Wrong' आणि Try Again असा लिहिलेला मजकूर पाहायला मिळत होता. बुधवारी संध्याकाळी 8.30 वाजल्यापासून ट्विटरचं पेज उघडत नव्हतं. यासंदर्भात ट्विटर करून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. भारतातच नव्हे, तर जगभरात ट्विटर उघडण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. परंतु आता ट्विटरची सेवा हळूहळू पूर्वपदावर आली आङे.