शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Elon Musk तयार करणार Smartphone? एका धमकीनं उडवली Apple आणि Google ची झोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 8:23 AM

Elon Musk यांच्या ट्विटने उडाली खळबळ...

ही बातमी वाचून आपणही म्हणाल, की Twiiter चे नवे बॉस इलॉन मस्क काहीही करू शकता. इलॉन मस्क यांनी स्मार्टफोन क्षेत्रातील अ‍ॅपल आणि गुगल या दिग्गज कंपन्यांना थेट इशारा दिला आहे. या दोन्ही कंपन्यांनी ट्विटरवर बंदी घातल्यास, आपण स्वतःचा स्मार्टफोन तयार करू, असे मस्क यांनी म्हटले आहे. अर्थात या कंपन्यांनी आपल्या प्ले स्टोअरवरून ट्विटर अ‍ॅप बॅन केल्यास, मस्क असा निर्णय घेऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, कंटेंट मॉडरेशन इश्यूच्या मुद्द्यावर Apple आणि Google अ‍ॅप स्टोरवर ट्विटर बॅन केले जाऊ शकते.

Elon Musk यांच्या ट्विटने उडाली खळबळ -यासंदर्भात एका युजरने विचारलेल्या प्रश्नला उत्तर देताना मस्क यांनी हे विधान केले आहे. जर गूगल अथवा अ‍ॅप्पलने आपल्या अ‍ॅप स्टोअरवरून ट्विटर बॅन केले, तर मस्क बाजारात नवा फोन आणणार का? असा प्रश्न या युजरने विचारला होता. यावर मस्क म्हणाले, आपण खरो खरच नवा फोन बाजारात आणू. 'मला आशा आहे, की असे होणार नाही. मात्र, हो, जर असे झालेच, तर मी फोन तयार करेन,' असे मस्क यांनी म्हटले आहे. मस्क यांच्या या उत्तरावर, Nothing चे फाउंडर Carl Pei यांनी रिअॅक्शन दिली आहे. आता पुढे मस्क काय करतात हे पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत.

Apple आणि Google ट्विटर बॅन करू शकतात का? तर याचे उत्तर हो असेल आहे. इलॉन मस्क यांची कंपनी असलेल्या ट्विटरने Apple आणि Google च्या दिशानिर्देशांचे पालन केले नाही, तर अ‍ॅप स्टोरवरून ट्विटर बॅन केले जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे, इलॉन मस्क ट्विटर सब्सक्रिप्शन प्लॅन लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. ते यूजर्स ना 8 डॉलर चार्ज करण्याची योजना तयार करत आहेत. यामुळे ट्विटरचा रेव्हेन्यू वाढेल. एवढेच नाही, तर ट्विटरच्या पेड सब्सक्रिप्शन प्लॅनचा Apple आणि Google लाही फायदा होईल.

 Apple आणि Google हे आपल्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी केल्या गेलेल्या सब्सक्रिप्शनवर कमीशन घेतात. हे दोघेही डेव्हलपर्सकडून 15 टक्के घेतात. ही किंमत 30 टक्क्यांवरून आता 15 टक्के करण्यात आली आहे. खरे तर, Apple आणि Google अशा प्रकारे चार्ज करत असल्यावरून इलॉन मस्क यांनी नेहमीच त्यांच्यावर टीका केली आहे. जर मस्क यांनी Apple आणि Google च्या पेमेंट स्ट्रक्चरकडे दूर्लक्ष केले, तर  अ‍ॅप स्टोअरवर ट्विट बॅन केले जाऊ शकते, असा दावा टेक अ‍ॅनालिस्ट मार्क गुरमन यांनी केला आहे.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कMobileमोबाइलApple Incअॅपलgoogleगुगल