Twitter मध्ये Quote Tweet नवीन फीचर; असा होणार याचा फायदा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 03:53 PM2020-09-01T15:53:19+5:302020-09-01T15:55:56+5:30

आता ट्विटरमध्ये रिट्विट विथ कमेंटचा ऑप्शन दिसत नाही, त्याऐवजी कोट ट्विट आले आहे. याचा लेआऊट आणि स्ट्रक्चर वेगळे आहे.

twitter quote tweet feature is now official | Twitter मध्ये Quote Tweet नवीन फीचर; असा होणार याचा फायदा...

Twitter मध्ये Quote Tweet नवीन फीचर; असा होणार याचा फायदा...

Next
ठळक मुद्देकंपनी कोट ट्विटला रिट्विट विथ कमेंट या नावाने टेस्ट करत होती.

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर ‘Quote Tweets’(कोट ट्विट्स) हे फीचर लाईव्ह करण्यात आले आहे. गेले काही दिवस हे फीचर टेस्टिंग दरम्यान पाहिले गेले होते. आता हे ऑफिशियल झाले आहे, म्हणजेच युजर्स त्याच्या वापर करू शकतात. कंमेट्ससोबत केलेल्या रिट्विट्सला कोट ट्विट, असे म्हटले जाईल. ट्विटवर टॅप करून, येथून कोट ट्विट्स सिलेक्ट करून सर्वांना एकाच ठिकाणी पाहू शकता, असे ट्विटरने म्हटले आहे.

ट्विटरच्या म्हणण्यानुसार, Retweets with Comment ला Quote Tweet मध्ये रूपांतरित केले जात आहेत. कोट ट्विट रिट्विटच्या जवळ दिसेल. कंपनी कोट ट्विटला रिट्विट विथ कमेंट या नावाने टेस्ट करत होती. ट्विटला किती लोकांनी काही लिहून रिट्विट केले आहे. ही यापूर्वी सुविधा नव्हती. फक्त किती रिट्वीट केले आहे, हे फक्त पाहता येत होते.

आता ट्विटरमध्ये रिट्विट विथ कमेंटचा ऑप्शन दिसत नाही, त्याऐवजी कोट ट्विट आले आहे. याचा लेआऊट आणि स्ट्रक्चर वेगळे आहे. यामध्ये टॅप केल्यामुळे जे ट्विट्स दिसतात. त्यामध्ये दुसर्‍याचे ट्विट कोट करून काहीतरी लिहिले आहे. दरम्यान, जे युजर्स ट्विटचा ट्रॅक ठेवू इच्छितात, त्यांच्यासाठी या फीचरचा फायदा होण्याची शक्यता आहे. आता हे समजू शकेल की, कोणी आपल्या ट्विटला काही काय लिहून रिट्विट केले आहे.

परवानगीशिवाय नाही देऊ शकणार कोणी ‘रिप्लाय’
ट्विटरवर एखाद्या पब्लिक ट्विटवर कोणालाही रिप्लाय देता यायचा, पण आता नवीन फीचरमुळे रिप्लायसाठी ‘लिमिट’ सेट करण्याचा पर्याय आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरने हे फीचर आणले आहे. यामध्ये कोणी रिप्लाय द्यायचा किंवा नाही, हे तुम्हाला ठरवता येणार आहे. जे युजर्स रिप्लाय देऊ शकणार नाहीत, ते आधीप्रमाणेच तुमच्या ट्विटला लाइक, शेअर रिट्विट किंवा कमेंट करुन रिट्विट करु शकतील.

आणखी बातम्या...

- चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती    

- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम

- "राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा    

- 'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा     

- 'पिया तू अब तो आजा...' या गाण्यावर वृद्ध महिलांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल   


 

Web Title: twitter quote tweet feature is now official

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.