चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 02:36 PM2020-09-01T14:36:35+5:302020-09-01T15:00:41+5:30

१९९६ बॅचच्या तेलंगणा कॅडरच्या आयपीएस अधिकारी चारू सिन्हा आता महानिरीक्षक म्हणून सीआरपीएफच्या श्रीनगर सेक्टरचा पदभार स्वीकारतील.

ips officer charu sinha to head terrorist hit srinagar sector for crpf | चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती

चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती

Next
ठळक मुद्देबिहारनंतर चारू सिन्हा यांची बदली महानिरीक्षक म्हणून जम्मूला करण्यात आली. यानंतर आता श्रीनगर सेक्टरमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा समूळ नाश करण्याची जबाबदारी आता एका महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) चारू सिन्हा यांची श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी (आयजी) नियुक्ती केली आहे. त्यामुळे चारु सिन्हा या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत, ज्यांना सीआरपीएफच्या श्रीनगर सेक्टरचे महानिरीक्षक बनविण्यात आले आहे.

१९९६ बॅचच्या तेलंगणा कॅडरच्या आयपीएस अधिकारी चारू सिन्हा आता महानिरीक्षक म्हणून सीआरपीएफच्या श्रीनगर सेक्टरचा पदभार स्वीकारतील. चारू सिन्हा यांच्याकडे अशी जबाबदारी सोपविण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्या सीआरपीएफ बिहार सेक्टरच्या महानिरीक्षक होत्या आणि त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात धडक मोहीम राबविली होती. बिहारनंतर चारू सिन्हा यांची बदली महानिरीक्षक म्हणून जम्मूला करण्यात आली. यानंतर आता श्रीनगर सेक्टरमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.

सीआरपीएफचे सध्याचे महासंचालक (डीजी) एपी माहेश्वरी सुद्धा २००५ मध्ये श्रीनगर सेक्टरचे महानिरीक्षक होते. या सेक्टरची सुरुवात २०५५ मध्ये झाली होती. आतापर्यंत याठिकाणी महानिरीक्षक म्हणून महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली नव्हती. या श्रीनगर सेक्टरचे काम जम्मू-काश्मीरपोलिसांच्या मदतीने दहशतवादविरोधी मोहीम राबविणे आहे. सीआरपीएफच्या श्रीनगर सेक्टरमध्ये जम्मू-काश्मीरचे तीन जिल्हे बडगाम, गांदरबल, श्रीनगर आणि लडाखचा परिसर येतो. या सेक्टरमध्ये २ रेंज, २२ कार्यकारी युनिट आणि तीन महिला कंपनी येतात.

आणखी बातम्या...

- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम

- "राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा    

- 'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा     

- 'पिया तू अब तो आजा...' या गाण्यावर वृद्ध महिलांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल    

Web Title: ips officer charu sinha to head terrorist hit srinagar sector for crpf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.