शहरं
Join us  
Trending Stories
1
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
2
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
3
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
4
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
5
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
6
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
7
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
8
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
9
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
10
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
11
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
12
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
13
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
14
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
15
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
16
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
17
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
18
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
19
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
20
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...

Twitter 'हे' लोकप्रिय फीचर हटवणार, युजर्सची चिंता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 13:57 IST

मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

ठळक मुद्देमायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.ट्विटर लवकरच रिट्विट हे आपलं लोकप्रिय फीचर हटवणार असल्याची माहिती मिळत आहे. ट्विटरच्या डेंटली डेविस यांनी एक ट्वीट करून याबाबतचे संकेत दिले आहेत. 

नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता ट्विटरने एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. ट्विटर लवकरच रिट्विट हे आपलं लोकप्रिय फीचर हटवणार असल्याची माहिती मिळत आहे. याबदल्यात कंपनी नवीन अँटी-हरासमेंट फीचर्स आणत आहे. यामुळे ट्विटरवर रिट्विट करणं आणि दुसऱ्या युजर्सना मेन्शन करण्याची पद्धत पूर्णत: बदलणार आहे. ट्विटरच्या डेंटली डेविस यांनी एक ट्वीट करून याबाबतचे संकेत दिले आहेत. 

2020 मध्ये ट्विटरवर कोणते बदल अपेक्षित आहेत याची माहिती डेविस यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. युजर्स आपलं खास ट्विट रिट्विट करण्याचा ऑप्शन बंद करू शकतात. तसेच एक यूजर दुसऱ्या युजर्सला त्याच्या परमिशन शिवाय मेन्शन करू शकत नाहीत. तसेच युजर्स आपल्या मर्जीने कोणत्या तरी खास संभाषणातून बाहेर पडू शकतात अशा गोष्टींचा समावेश ट्विटमध्ये करण्यात आलं आहे. यानुसार लवकरच युजर्स आपलं ट्विट कोणी रिट्विट करावं हे ठरवू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

ट्विटरवर आता राजकीय जाहिराती दिसणार नाहीत कारण ट्विटरने सर्व प्रकारच्या राजकीय जाहिराती बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी याबाबत घोषणा केली आहे. ट्वीट करून जॅक यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. जॅक यांनी 'आम्ही जगभरात सर्व राजकीय जाहिराती रोखण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय संदेश हा इतरांपर्यंत पोहोचवला पाहिजे पण तो विकत घेतला जाऊ नये असं आमचं मत आहे. का? तर काही कारणांसाठी...' असं ट्विट केलं आहे. 15 नोव्हेंबर रोजी याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. 22 नोव्हेंबरपासून ट्विटरवर राजकीय जाहिराती दिसणार नाहीत. हे लागू करण्याआधी जाहिरातदारांना नोटिस  देण्यात येणार आहे. 

'इंटरनेटवर जाहिराती खूप ताकदवान आणि प्रभावी ठरतात. व्यावसायिक जाहिरातींपर्यंत ठिक आहे, पण ही ताकद राजकीय जाहिरातींच्या बाबतीत मोठी जोखीम ठरू शकते. राजकारणामध्ये या जाहिरातींचा उपयोग मतांवर प्रभाव पाडण्यासाठी होऊ शकतो, याचा परिणाम लाखो लोकांच्या जीवनावर होण्याची शक्यता असते' असं देखील जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर

सोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये चूक असल्यास अथवा अन्य काही कारणांमुळे ती पोस्ट एडिट करायची असल्यास एडिटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र Twitter वर ट्वीट एडिट करता येत नाही. ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. ट्वीट एडिट करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सला फायदा होणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे. त्याच विंडोमध्ये युजर्स ते एडिट करू शकतात.

 

टॅग्स :Twitterट्विटरtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडियाMobileमोबाइल