TikTok donates medical equipment worth 100 crore to fight Corona SSS | Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी TikTok चा पुढाकार, 100 कोटींची केली मदत

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी TikTok चा पुढाकार, 100 कोटींची केली मदत

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 58 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 2000 हून अधिक झाली आहे. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी टिकटॉकने मदतीचा हात दिला आहे.

शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकने कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. टिकटॉकने 100 कोटींची मदत जाहीर केली आहे. भारताला टिकटॉकडून 100 कोटींचे मेडिकल इक्विपमेंट देण्यात आले आहेत. यामध्ये 4,00,000 प्रोटेक्टिव्ह सूट आणि 2,00,000 मास्कचा समावेश आहे. टिकटॉकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 'सध्या भारतात जी कठीण परिस्थिती आहे. या परिस्थितीत आम्ही भारतासोबत आहोत' असं टिकटॉकने म्हटलं आहे.

टिकटॉकने भारताला 4,00,000 प्रोटेक्टिव्ह सूट आणि 2,00,000 मास्क देण्याचा निर्णय घेतला आहे. 'डॉक्टर्सच्या सुरक्षेसाठी आम्ही भारताला प्रोटेक्टिव्ह सूट आणि मास्क दिले आहे. व्हायरसच्या संपर्कात सर्वात जास्त डॉक्टर्स राहतात. त्यामुळे डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे' असं टिकटॉकने म्हटलं आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या टिकटॉकचा भारतात वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून असंख्य युजर्स आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी 800 मिलियन डॉलरपेक्षा जास्त म्हणजेच जवळपास 5 हजार 900 कोटींची मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. 

लघू तसेच मध्यम उद्योग, आरोग्य संघटना तसेच प्रशासन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी गुगलने ही मदत जाहीर केली आहे. सुंदर पिचाई यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. 'गुगल अ‍ॅड क्रेडिटच्या रुपात 340 मिलियन डॉलर दिले जाईल. हे क्रेडिट मागील एक वर्षापासून सक्रिय खाते किंवा व्यवसाय असलेल्या लोकांना दिले जाईल' असं ट्विट पिचाई यांनी केलं आहे. सुंदर पिचाई यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि 100 पेक्षा अधिक शासकीय यंत्रणांसाठी सुमारे 1800 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तसेच 150 कोटी रुपये सामुदायिक वित्तीय संस्था तसेच स्वयंसेवी संस्था, 2500 कोटी लघू तसेच मध्यम उद्योगांना उपलब्ध करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : 'त्या' 15 जणांचा एकाच ट्रेनने प्रवास, दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमाचे भिवंडी कनेक्शन

Coronavirus : चिंताजनक! जगभरात तब्बल 9,36,204 कोरोनाग्रस्त; इटली, स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू

Coronavirus : 10 दिवस 'तो' कोरोनाविरोधात लढला आणि अखेर जिंकला, म्हणाला...

Coronavirus : कोरोनामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीचा मृत्यू

Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त

 

Web Title: TikTok donates medical equipment worth 100 crore to fight Corona SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.