Reliance Jio चं नेटवर्क डाऊन; ट्विटरवर युझर्सचा तक्रारींचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 14:01 IST2022-02-05T14:01:24+5:302022-02-05T14:01:54+5:30

सकाळपासून Reliance Jio चं Network डाऊन असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत.

telecom operator reliance jio network down in mumbai and other parts users complaining on twitter jiodown trending | Reliance Jio चं नेटवर्क डाऊन; ट्विटरवर युझर्सचा तक्रारींचा पाऊस

Reliance Jio चं नेटवर्क डाऊन; ट्विटरवर युझर्सचा तक्रारींचा पाऊस

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Reliance Jio चं नेटवर्क डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळपासूनच अनेकांना नेटवर्कची समस्या उद्भवत असल्याची माहिती नेटकऱ्यांनी ट्वीटरवर दिली. अनेक युझर्सना याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांनी रिलायन्स जिओच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तक्रारीही केल्या आहेत.

दरम्यान, नेटवर्कची समस्या कशामुळे उद्भवली आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, कंपनीकडूनदेखील यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहितीही देण्यात आलेली नाही.










रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. दरम्यान, रिलायन्स जिओचं नेटवर्क डाऊन झाल्यानंतर अनेकांनी ट्रोलही करण्यास सुरूवात केली आहे. सारखा सारखा तुमचा फोन रिस्टार्ट करू नका, नेटवर्क डाऊन आहे असं म्हणत एका युझरनं कमेंट केलं आहे. तर एकानं थोडा वेळ झोपून घेतो असं म्हणत कमेंट केलं आहे.

Web Title: telecom operator reliance jio network down in mumbai and other parts users complaining on twitter jiodown trending