सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:42 IST2025-11-18T18:41:30+5:302025-11-18T18:42:30+5:30
युजर्स जेव्हा 'X' ॲप किंवा वेबसाइट उघडत होते, तेव्हा त्यांना 'रिफ्रेश' करण्याचा मेसेज दिसत होता किंवा "Something went wrong. Try reloading." असा एरर दिसत होता.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
जगातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) ची सेवा आज सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास काही मिनिटांसाठी विस्कळीत झाली होती. भारतातील हजारो युजर्सनी 'X' (एक्स) ॲप आणि वेबसाइट वापरण्यात अडचणी आल्याची तक्रार केली. Downdetector या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जगभरातील हजारो युजर्सनी ही समस्या नोंदवली.
'X' ठप्प होण्यामागे केवळ तांत्रिक दोष नसून, Cloudflare या इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्ममध्ये आलेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडाचे हे परिणाम होते. क्लाउडफ्लेअरच्या नेटवर्कमध्ये समस्या आल्यामुळे 'X' सोबतच ChatGPT आणि Gemini यांसारख्या अनेक मोठ्या वेबसाइट्स आणि डिजिटल सेवा तात्पुरत्या स्वरूपात बाधित झाल्या होत्या.
युजर्स जेव्हा 'X' ॲप किंवा वेबसाइट उघडत होते, तेव्हा त्यांना 'रिफ्रेश' करण्याचा मेसेज दिसत होता किंवा "Something went wrong. Try reloading." असा एरर दिसत होता. मात्र, काही मिनिटांच्या गोंधळानंतर क्लाउडफ्लेअरने तातडीने समस्या सोडवली. त्यामुळे 'X' सह बहुतांश डिजिटल सेवा पूर्ववत सुरू झाल्या, ज्यामुळे युजर्सनी सुटकेचा श्वास घेतला.