WhatsApp वर हार्ट इमोजी पाठवल्यास होऊ शकतो तुरुंगवास अन् 20 लाखांचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 17:52 IST2022-02-17T17:25:31+5:302022-02-17T17:52:11+5:30
WhatsApp : रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाच्या सायबर क्राईम तज्ज्ञाचे म्हणणे आहे की, व्हॉट्सअॅपवर रेड हार्ट इमोजी पाठवल्यास तुम्हाला कायदेशीर अडचणीत येऊ शकते.

WhatsApp वर हार्ट इमोजी पाठवल्यास होऊ शकतो तुरुंगवास अन् 20 लाखांचा दंड!
व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे आज जगातील सर्वात लोकप्रिय मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपवर लोक पर्सनल ते प्रोफेशनल चॅट करतात. परंतु व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करण्याची ही सवय तुम्हाला तुरुंगात टाकू शकते आणि 20 लाख रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाच्या सायबर क्राईम तज्ज्ञाचे म्हणणे आहे की, व्हॉट्सअॅपवर रेड हार्ट इमोजी पाठवल्यास तुम्हाला कायदेशीर अडचण येऊ शकते.
20 लाखांचा दंड अन् पाच वर्षांच्या तुरुंगवास
रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, सौदी अरेबियामध्ये व्हॉट्सअॅपवर रेड हार्ट इमोजी पाठवल्यास 100,000 सौदी रियाल म्हणजेच सुमारे 20 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. या दंडासोबत दोन ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. गल्फ न्यूजमधील एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सौदी अरेबियाच्या अँटी फ्रॉड असोसिएशनचे सदस्य अल मोअताज कुतबी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, व्हॉट्सअॅपवर रेड हार्ट इमोजी पाठवणे म्हणजे त्रास देणे होय. ते पुढे म्हणाले की ऑनलाइन चॅट दरम्यान काही फोटो आणि इमोजी छळाच्या गुन्ह्यात बदलू शकतात, परंतु एखाद्याने त्याच्याविरुद्ध खटला दाखल केला तरच त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
लाल गुलाब इमोजी सुद्धा धोकादायक!
या संदर्भात लोकांना चेतावणी देणारे एक निवेदन अल मोअताज कुतबी यांनी जारी केले आहे, ज्यामध्ये रेड हार्ट इमोजीबद्दल विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. अल मोअताज कुतबी यांच्या मते, लैंगिक संबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीने आपल्या शरीराला स्पर्श करणार्या किंवा तसे करण्याचा इरादा असलेल्या दुसर्या व्यक्तीकडे केलेले प्रत्येक विधान, कृती किंवा हावभाव म्हणून छळ केला जाऊ शकतो. त्यात इमोजीचाही समावेश आहे. रेड हार्ट इमोजी व्यतिरिक्त, लाल गुलाब इमोजी देखील तुम्हाला अडचणीत आणू शकतात.