परवडणाऱ्या किंमतीत येतोय Samsung चा टॅबलेट; Galaxy Tab A8 करणार शाओमी-रियलमीची बोलती बंद 

By सिद्धेश जाधव | Published: November 4, 2021 01:25 PM2021-11-04T13:25:57+5:302021-11-04T13:26:44+5:30

Samsung Galaxy Tab A8: Samsung Galaxy Tab A8 टॅबलेट ब्लूटूथ एसआईजी आणि गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. हा एक मिडरेंज टॅबलेट असेल जो लवकरच सादर केला जाऊ शकतो.

Samsung galaxy tab a8 spotted on geekbench with unisoc t618 chipset and 3gb ram  | परवडणाऱ्या किंमतीत येतोय Samsung चा टॅबलेट; Galaxy Tab A8 करणार शाओमी-रियलमीची बोलती बंद 

(सौजन्य: 91mobiles)

googlenewsNext

अँड्रॉइड टॅबलेटच्या सेगमेंटमध्ये सॅमसंगचे नाव खूप लोकप्रिय आहे. परंतु गेले काही महिने या सेगमेंटमध्ये रेलचेल वाढली आहे. शाओमी पुन्हा सक्रिय झाली आहे तर रियलमी आणि नोकियाने देखील आपले टॅबलेट डिवाइस सादर केले आहेत. आता Samsung सध्या मिडरेंज टॅबलेट Galaxy Tab A8 वर काम करत आहे, जो Galaxy Tab A7 ची जागा घेईल.  

आता 91Mobiles ने सॅमसंगच्या आगामी Tab A8 टॅबलेटचे डिजाइन रेंडर आणि स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. याआधी हा डिवाइस Bluetooth SIG सर्टिफिकेशन्सवर दिसला आहे. तसेच आता Galaxy Tab A8 टॅबलेट गीकबेंचवर देखील लिस्ट झाला आहे. 

Samsung Galaxy Tab A8  

Samsung Galaxy Tab A8 टॅबलेट ब्लूटूथ एसआईजी आणि गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. हा एक मिडरेंज टॅबलेट असेल जो लवकरच सादर केला जाऊ शकतो. ज्यात 2.0GHz स्पीड असलेला ऑक्टा-कोर Unisoc T618 चिपसेट देण्यात येईल. त्याचबरोबर 3GB रॅम मिळू शकतो. गिकबेंचच्या सिंगल कोर टेस्टमध्ये 1704 पॉइंट्स आणि मल्टी कोर टेस्टमध्ये या टॅबला 5256 पॉइन्ट्स मिळाले आहेत. Samsung Galaxy Tab A8 गीकबेंचवर SM-X205 या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे.  

Samsung Galaxy Tab A8 टॅब 4GB व्हेरिएंटमध्ये देखील उपलब्ध होऊ शकतो. सोबत 32GB, 64GB किंवा 128GB स्टोरेजचे ऑप्शन मिळू शकतात. यात 10.5-इंचाचा TFT WUXGA (1920×1200) डिस्प्ले असेल. फोटोग्राफिसाठी टॅबमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच यात सॅमसंगच्या या आगामी टॅबमध्ये 7040mAh ची बॅटरी आणि फास्ट चार्जिंग दिली मिळेल.  

हा टॅब वायफाय ओन्ली आणि एलटीई व्हेरिएंट उपलब्ध होतील. त्याचबरोबर या टॅबमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देण्यात येईल. Samsung च्या आगामी टॅबमध्ये क्वॉड स्पिकर आणि Dolby Atmos सपोर्टसह देण्यात येईल. या टॅबलेटमध्ये चार्जिंगसाठी टाइप सी पोर्ट आणि फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल. हा टॅब गोल्ड, सिल्वर आणि ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात येईल.  

 

Web Title: Samsung galaxy tab a8 spotted on geekbench with unisoc t618 chipset and 3gb ram 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.