Samsung Galaxy S21 FE लाँचच्या उंबरठ्यावर; 8GB रॅम आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह होऊ शकतो सादर  

By सिद्धेश जाधव | Published: July 8, 2021 02:31 PM2021-07-08T14:31:16+5:302021-07-08T14:32:27+5:30

Samsung Galaxy S21 FE TENAA: गीकबेंचवर Samsung Galaxy S21 FE स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर आणि 8GB रॅमसह लिस्ट झाला होता.  

Samsung galaxy s21 fe spotted on tenaa launch soon  | Samsung Galaxy S21 FE लाँचच्या उंबरठ्यावर; 8GB रॅम आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह होऊ शकतो सादर  

Samsung Galaxy S21 FE लाँचच्या उंबरठ्यावर; 8GB रॅम आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह होऊ शकतो सादर  

Next

Samsung Galaxy S21 FE ची चर्चा गेले कित्येक दिवस टेक विश्वात सुरु आहे. लाँचपूर्वी हा डिवाइस अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला आहे. आता हा फोन अधिकृतपणे सादर होण्यापूर्वी TENAA वर लिस्ट झाला आहे. .या लिस्टिंगमध्ये फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली आहे. सॅमसंगने Samsung Galaxy S21 FE संबंधित कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु हा डिवाइस ऑक्टोबरमध्ये लाँच केला जाईल आणि हा फक्त अमेरिका आणि युरोपपुरता मर्यादित असेल, अशी चर्चा आहे.  (Samsung Galaxy S21 FE gets TENAA certification)

टेना लिस्टिंगनुसार, Samsung Galaxy S21 FE मध्ये 6.4-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले असू शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लिस्टिंगमधून 4,370 mAh च्या बॅटरीची माहिती समोर आली आहे. अलीकडेच समोर आलेल्या FCC आणि 3C सर्टिफिकेशनच्या लिस्टिंगनुसार फोनमध्ये क्रमशः 45 वॉट आणि 25 वॉट फास्ट चार्जिंग असू शकते. गीकबेंचवर Samsung Galaxy S21 FE स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर आणि 8GB रॅमसह लिस्ट झाला होता.  

Samsung Galaxy S21 FE चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

आता पर्यंत आलेल्या लीक बातम्यांनुसार, या स्मार्टफोनमध्ये 12MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित One UI 3.1.1 वर चालेल. तसेच यात 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेजसह मिळू शकते. Samsung Galaxy S21 FE मध्ये 6.4 इंचाचा पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो.  

Web Title: Samsung galaxy s21 fe spotted on tenaa launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.