शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

सॅमसंगने गॅलेक्सी जे 2 प्रो आणि गॅलेक्सी जे 2च्या किंमतीत केली घट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 10:07 AM

सॅमसंगने गॅलेक्सी जे 2 प्रो व गॅलेक्सी जे 2 (2017)  या दोन स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे.

मुंबई- सॅमसंगने गॅलेक्सी जे 2 प्रो व गॅलेक्सी जे 2 (2017)  या दोन स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. आता सॅमसंगने गॅलेक्सी जे 2 प्रो 7 हजार 690 रूपयांना खरेदी करता येणार आहे. तर गॅलेक्सी जे 2 6 हजार 590 रूपयांना खरेदी करता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे 2 प्रोच्या किंमत 2 हजार 200 रूपयांनी कमी करण्यात आली आहे तर गॅलेक्सी जे 2 ची किंमत 800 रूपयांनी कमी करण्यात आली आहे. मुंबईचे प्रसिद्ध रिटेलर महेश टेलीकॉमने ट्विट करून याबद्दलची माहिती दिली.  

सॅमसंग जे 2 प्रो स्मार्टफोनला ५ इंच आकारमानाचा आणि ५४० बाय ९६० पिक्सल्स क्षमतेचा (क्युएचडी) सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम १.५ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एफ/२.२ अपार्चरसह ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल.

सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८) या मॉडेलमध्ये २६०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती दीर्घ काळापर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

सॅमसंग गॅलेक्सी जे2 (2017) चे फीचर्स- सॅमसंग गॅलेक्सी जे 2 (2017) मध्ये 4.7 इंच आकारमानाचा एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. यामध्ये 1.3 गीगाहर्ड्ज क्वॉड-कोअर प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 1 जीबी रॅम असून 8 जीबी इंटरनल मेमरी आहे. फोनच्या इंटरनल मेमरीला मायक्रोएसडी कार्डने 128 जीबी पर्यंत वाढवता येईल.  स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सल ऑटो फोकस कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी सेल्फी 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. गुगलच्या एन्ड्रॉइड 6.0 मार्शमॅलोवर फोन चालतो. फोनमध्ये 4 जी एलटीई सपोर्ट असून 2 हजार मेगाहॅट्स बॅटरी आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानsamsungसॅमसंगMobileमोबाइल