सलमान, पिचाई, ट्रम्प यांचा ट्विटर डेटा केवळ १५० रुपयांना; २० कोटी युजर्सचा डेटा चोरला; माहिती व प्रसारण खात्याचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 06:21 AM2023-01-07T06:21:43+5:302023-01-07T06:23:05+5:30

विशेष म्हणजे ज्यांनी ट्विटर खरेदी केले त्या इलॉन मस्क यांच्याच स्पेसेक्सचा डेटाही चोरीला गेला आहे. या डेटाची किंमत केवळ दोन डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे.

Salman Khan, Sundar Pichai, Donald Trump's Twitter data up on sale for just Rs 150; Twitter’s 200 million account data leak: Here’s what you can do | सलमान, पिचाई, ट्रम्प यांचा ट्विटर डेटा केवळ १५० रुपयांना; २० कोटी युजर्सचा डेटा चोरला; माहिती व प्रसारण खात्याचाही समावेश

सलमान, पिचाई, ट्रम्प यांचा ट्विटर डेटा केवळ १५० रुपयांना; २० कोटी युजर्सचा डेटा चोरला; माहिती व प्रसारण खात्याचाही समावेश

googlenewsNext

वॉशिंगटन : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, डोनाल्ड ट्रम्प, अभिनेता सलमान खान यांच्यासह जवळपास २० कोटींपेक्षा अधिक ट्विटर वापरकर्त्यांचा खासगी डेटा चोरून हॅकर्सनी ऑनलाइन हॅकिंग फाेरमवर पोस्ट केला आहे. यात भारताच्या माहिती-तंत्रज्ञान खात्याचेही नाव आहे. विशेष म्हणजे ज्यांनी ट्विटर खरेदी केले त्या इलॉन मस्क यांच्याच स्पेसेक्सचा डेटाही चोरीला गेला आहे. या डेटाची किंमत केवळ दोन डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे.

कुणी दिली माहिती? 
इस्रायलची सायबर सुरक्षा निगराणी संस्था ‘हडसन रॉक’चे संस्थापक अलोन गॅल 

काय माहिती चोरली? 
वापरकर्त्यांच्या ई-मेल ॲड्रेस. लाेकेशन यासह इतर माहिती हॅकर्सच्या हाती लागली आहे.

हॅकिंगच्या दोन पद्धती
तांत्रिक दोष : समाज माध्यम वेबसाइटवरील तांत्रिक त्रुटी शोधून हॅकिंग केले जाते.
फिशिंग ट्रॅप : हॅकर्स वापरकर्त्यांना मेसेज अथवा कॉल करून फिशिंग लिंक शेअर करतात व त्याद्वारे खाते हॅक करतात.

हॅकिंगपासून कसे वाचावे? 
- खात्याचा तपशील कोणाशीही शेअर करू नये.
- कोणालाही ओटीपी सांगू नये.
- कोणत्याही अज्ञात आलेली लिंक उघडू नयेत.

३०,००० डॉलर्समध्ये ५४ लाख ट्टिटर युझर्सचा डेटा जुलै २०२२ मध्ये विक्रीसाठी हॅकर्सने बाहेर काढला होता.

२०२२ च्या नोव्हेंबर मध्येही १७ लाख ट्टिटर युझर्सचा डेटा चोरण्यात आला होता.

२ डॉलर्स इतकी किंमत ई-मेल ॲड्रेसच्या विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.

Web Title: Salman Khan, Sundar Pichai, Donald Trump's Twitter data up on sale for just Rs 150; Twitter’s 200 million account data leak: Here’s what you can do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.