शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

भारीच! TikTok युजर्सना आकर्षित करण्यासाठी Rizzleने आणला 'हा' भन्नाट प्रोग्राम, क्रिएटर्सना मिळणार अनोखी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 14:16 IST

टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर आता अल्पावधीतच रिझल हे अ‍ॅप लोकप्रिय झालं आहे. हे एक शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप असून क्रिएटर्सना एक अनोखी संधी देत आहे.

नवी दिल्ली - देशात लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. टिकटॉकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. टिकटॉक सारखीच सुविधा देणारे काही अ‍ॅप्स आता वेगाने व्हायरल होत आहेत. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर आता अल्पावधीतच रिझल हे अ‍ॅप लोकप्रिय झालं आहे. हे एक शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप असून क्रिएटर्सना एक अनोखी संधी देत आहे. TikTok युजर्सना आकर्षित करण्यासाठी Rizzleने एक भन्नाट प्रोग्राम आणला आहे. रिझलने ‘मिलियन स्टार्स रिझल प्रोग्राम’ (Million Stars Rizzle Program) लाँच केला आहे. 

रिझलच्या या भन्नाट प्रोग्राममुळे भारतातील कंटेन्ट क्रिएटर्सना आपल्या कलागुणांसाठी एक चांगलं व्यासपीठ मिळणार आहे. टॉक शोज, मिनी सिरीज, कुकिंग शोज, रिव्ह्यू चॅनल्ससह आणखी बऱ्याच गोष्टींसाठी रिझल युजर्सना सातत्याने प्रोत्साहन देतं. मात्र आता रिझल टिकटॉक युजर्सना आकर्षित करत आहे. मिलियन स्टार्स रिझल प्रोग्राममुळे हजारो युजर्सना येत्या 6 ते 12 महिन्यांत आपापल्या क्षेत्रात सुपरस्टार होण्याची संधी मिळणार आहे. 3 ते 5 मिनिटांचे व्हिडीओ अपलोड करायचे आहेत.

काही निवडक 700 क्रिएटर्सना स्वत:चे चॅनल सुरू करण्यासाठी रिझल मदत करणार असून तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला देखील मिळणार आहे. रिझल क्रिएटर्सना चॅनलचे समीक्षण आणि अभिप्राय, अ‍ॅप फीचरबद्दलचे नियमित वेबिनार आणि प्रश्नोत्तरे, कार्यक्रम होस्ट करण्याची संधी देणार आहे. पहिल्या 1000  पात्र क्रिएटर्सना रिझल स्पॉन्सरशिप कूपन्सद्वारे आर्थिक सहाय्य देखील करणार आहे. याचा वापर युजर्स रिझलवर चॅनलसाठी करू शकतात. तसेच यातून त्यांना उत्पन्न मिळण्यास देखील मदत होणार आहे.

रिझल अ‍ॅपमध्ये अनेक नवनवीन फीचर्स देण्यात आले आहेत. डान्स आणि गाण्यांव्यतिरिक्त इतरही अनेक शॉर्ट व्हिडीओ युजर्स तयार करू शकतात.  2019 मध्ये लाँचिंगपासून रिझलने या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅपच्या स्पर्धेत जागतिक दर्जाचे व्हिडिओ अ‍ॅप सादर केले आहे. भारतातील क्रिएटर्सना अर्ज करता येणार आहे. ईमेलद्वारे अर्ज करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. क्रिएटर्स अ‍ॅप डाऊनलोड करू शकतात किंवा msrp@rizzle.tv वर अर्ज करू शकतात. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : अरे व्वा! देशातील वयोवृद्ध दाम्पत्याने जिंकली कोरोनाची लढाई, तब्बल 25 दिवसांनी केली मात

मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; Helo Lite सहीत 'या' अ‍ॅप्सवर घालणार बंदी 

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! फक्त तीन दिवसांत देशात 1 लाख नवे रुग्ण; धडकी भरवणारा ग्राफ

CoronaVirus News : कोरोना संकटातील भयानक वास्तव! 50 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार, सरकारने दिलं 'हे' कारण

CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...

CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

टॅग्स :technologyतंत्रज्ञानIndiaभारतTik Tok Appटिक-टॉक