जिओचे 5G नेटवर्क या पाच बँडवर चालणार; तुमचा मोबाईल सपोर्ट करतो का? जीव भांड्यात पडेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 02:57 PM2022-09-12T14:57:29+5:302022-09-12T14:58:11+5:30

जिओ सर्वच्यासर्व २२ सर्कलमध्ये ५जी लाँच करेल. परंतू, याची सुरुवात आधी १३ शहरांमध्ये केली जाणार आहे. तुम्हाला 5G SA आणि 5G NSA असे दोन प्रकार दिसतील.

Reliance Jio's 5G network will run on these five bands, Does your mobile support it? check it before festival sales smartphone buy | जिओचे 5G नेटवर्क या पाच बँडवर चालणार; तुमचा मोबाईल सपोर्ट करतो का? जीव भांड्यात पडेल...

जिओचे 5G नेटवर्क या पाच बँडवर चालणार; तुमचा मोबाईल सपोर्ट करतो का? जीव भांड्यात पडेल...

googlenewsNext

रिलायन्स जिओचे ५जी नेटवर्क दिवाळीपर्यंत लाँच होणार आहे. केंद्रीय मंत्रालयानुसार जिओ, एअरटेल सप्टेंबरच्या अखेरीस फाईव्ह जी नेटवर्क लाँच करतील. म्हणजेच देशात येत्या काही दिवसांत ५जी नेटवर्कद्वारे क्रांतीला सुरुवात होईल. या साऱ्या घडामोडींवर तुमच्याकडील ५जी फोन जिओच्या नेटवर्कवर चालेल का, हा मुद्दा चर्चिला जात आहे. जिओकडे कोणचे बँड आहेत...

जिओनुसार ते स्टँडअलोन (SA) 5G नेटवर्क आणणार आहेत. म्हणजेच Jio 5G हे 4G नेटवर्कवर अवलंबून नसेल म्हणजेच Jio 5G SA साठी संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्टर स्वतंत्रपणे तयार केले जाणार आहे. भारतीय बाजारपेठेत सर्व कंपन्यांचे 5G स्मार्टफोन आहेत, परंतु अनेकांना बँडबाबत समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही Jio चे 5G सिम घेण्याचा विचार करत असाल, तर तुमचा फोन Jio 5G SA ला सपोर्ट करेल की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. 

जिओचे ५जी नेटवर्क हे पाच बँडवर चालणार आहे. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये हे बँड असणे गरजेचे आहे. n3, n5, n28, n77 आणि n78 असे हे बँड आहेत. तुम्ही जेव्हा ऑनलाईन मोबाईल विकत घेता, तेव्हा त्याच्या स्पेसिफिकेशनमध्ये हे बँड नमूद असतात किंवा तुमच्या मोबाईलच्या बॉक्सवर किंवा आतमध्ये माहिती पुस्तिकेवर याची नोंद असते. एअरटेल देखील याच किंवा एखाद दुसऱ्या बदललेल्या बँडवर ५जी लाँच करेल. जवळजवळ सर्वच स्मार्टफोन कंपन्यांकडे या बँडचे मोबाईल आहेत. काहींकडे दोन बँड तर काहींकडे पाच, आठ आणि तेरापर्यंत बँड आहेत. 

जिओ सर्वच्यासर्व २२ सर्कलमध्ये ५जी लाँच करेल. परंतू, याची सुरुवात आधी १३ शहरांमध्ये केली जाणार आहे. तुम्हाला 5G SA आणि 5G NSA असे दोन प्रकार दिसतील. त्यापैकी जिओ SA चे बँड वापरणार आहेत. NSA चा अर्थ नॉन-स्टँडअलोन असा होतो, म्हणजेच ते बँड 4जी वर अवलंबून असतील असे आहे. यामुळे एअरटेल, व्होडाफोन या स्टँडअलोन की नॉन-स्टँडअलोन बँडवर ५जी नेटवर्क उभारतात हे पहावे लागणार आहे. 

Web Title: Reliance Jio's 5G network will run on these five bands, Does your mobile support it? check it before festival sales smartphone buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.