वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 10:55 IST2026-01-12T10:54:54+5:302026-01-12T10:55:18+5:30
Reliance Jio ₹450 Festive Plan: जिओने लाँच केला नवा ₹450 चा प्लॅन. 36 दिवसांची वैधता, 2GB डेली डेटा आणि ₹35,100 किमतीचे गुगल जेमिनी प्रो सबस्क्रिप्शन मोफत मिळवा.

वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
मुंबई: रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 'फेस्टिव्ह ऑफर' अंतर्गत एक अतिशय किफायतशीर आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. ₹450 किमतीच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना केवळ डेटा आणि कॉलिंगच नाही, तर प्रगत AI तंत्रज्ञान आणि मनोरंजनाचे मोठे पॅकेजही मिळत आहे.
साधारणपणे 28 दिवसांच्या वैधतेच्या तुलनेत हा प्लॅन 36 दिवसांची वैधता देतो. म्हणजेच वर्षाला ३६५ दिवसांसाठी तुम्हाला जी १३ रिचार्ज करावी लागतात ती आता ३६० दिवसांसाठी १० च करावी लागणार आहेत, उरलेल्या पाच दिवसांसाठी ११ वे रिचार्ज करावे लागणार आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो (एकूण 72GB डेटा). ज्या ग्राहकांकडे 5G फोन आहे आणि ते जिओच्या 5G कव्हरेजमध्ये आहेत, त्यांना Unlimited 5G डेटा वापरता येईल. तसेच देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळणार आहेत.
₹35,000 पेक्षा जास्त किमतीचे डिजिटल गिफ्ट्स
या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासोबत मिळणारे अतिरिक्त फायदे आहेत.
१. Google Gemini Pro: सुमारे ₹35,100 किमतीचे Google चे प्रगत AI 'Gemini Pro' चे 18 महिन्यांचे सबस्क्रिप्शन मोफत.
२. JioHotstar: 3 महिन्यांचे जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन, ज्यावर तुम्ही चित्रपट आणि क्रिकेटचा आनंद घेऊ शकता.
३. Cloud Storage: 50GB मोफत JioAICloud स्टोरेज.
४. JioHome Trial: नवीन जिओहोम ब्रॉडबँड कनेक्शनवर 2 महिन्यांची फ्री ट्रायल.