शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

मस्तच! जिओ युजर्ससाठी खूशखबर, फ्री-कॉलिंगची स्पेशल ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 11:16 AM

रिलायन्स जिओने दिवाळीआधी फ्री कॉलिंगची सुविधा बंद करून आपला युजर्सना दणका दिला आहे. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक खूशखबर आहे.

ठळक मुद्देजिओने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे.  पहिल्यांदा फोन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 30 मिनिटांचा फ्री टॉकटाईम मिळणार आहे.वन-टाईम ऑफर प्लॅनच्या घोषणेनंतर पहिल्या 7 दिवसांसाठी ही ऑफर उपलब्ध असणार आहे. 

नवी दिल्ली - रिलायन्स जिओने दिवाळीआधी फ्री कॉलिंगची सुविधा बंद करून आपला युजर्सना दणका दिला आहे. कॉल टर्मिनेशन चार्जशी संबंधीत नियमांमुळे जिओने आपली कॉलिंग पॉलिसी बदलली आहे. त्यामुळे जिओ युजर्सना आता जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. याआधी ही सुविधा मोफत देण्यात आली होती. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक खूशखबर आहे. कंपनीने फ्री टॉकटाईम देण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिओने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे.  फ्री टॉकटाईमची मर्यादा आता 30 मिनिटे असणार आहे. जिओची लिमिटेड मर्यादा ऑफर ही 48 तासांपेक्षा कमी आहे. पॅक रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना कंपनीने मेसेज पाठवायला सुरुवात केली आहे. जिओच्या ग्राहकांसाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा फोन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 30 मिनिटांचा फ्री टॉकटाईम मिळणार आहे. या वन-टाईम ऑफर प्लॅनच्या घोषणेनंतर पहिल्या 7 दिवसांसाठी ही ऑफर उपलब्ध असणार आहे. 

रिलायन्स जिओच्या घोषणेनंतर ट्विटरवर boycott-Jio हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला होता. काही ग्राहकांनी जिओच्या प्लॅनवर टीका केली आहे. जिओची फ्री कॉलिंगची सुविधा कधीपर्यंत असणार असा प्रश्न अनेक युजर्सना पडला होता. जिओने आता या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. जिओ युजर्सना जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. 10 ऑक्टोबरनंतर लागू करण्यात येईल अशी माहिती याआधी जिओने आपल्या युजर्सना दिली होती. मात्र आता याबाबत ट्वीट करून जिओने नवीन अपडेट दिलं आहे. युजर्सने केलेला रिचार्ज प्लॅन संपल्यानंतरच त्यांना IUC चार्जेस द्यावे लागणार आहेत. प्लॅन अ‍ॅक्टिवेट असेपर्यंत फ्री कॉलिंगची सुविधा असणार आहे. 

जिओने दिलेल्या माहितीनुसार, '9 ऑक्टोबर किंवा त्याधी कोणताही प्लॅनसाठी जिओ नंबरवर रिचार्ज  केला असल्यास तो प्लॅन संपेपर्यंत (जिओ व्यतिरिक्त अन्य नेटवर्कवर देखील) फ्री कॉलिंगची सुविधा युजर्सना मिळणार आहे.' त्यामुळेच युजर्सना जिओ प्लॅनची व्हॅलिडीटी चेक करावी लागणार आहे. ती संपल्यानंतर वेगळा आययूसी टॉप-अप रिचार्ज करावा लागणार आहे. जिओने 10 रुपयांपासून 100रुपयांपर्यंत टॉप-अप वाउचर इंट्रोड्यूस केले आहेत. 10 रुपयांच्या प्लॅनवर 1 जीबी आणि 100 रुपयाच्या रिचार्जवर 10 जीबी अ‍ॅडिशनल डेटा युजर्सना मिळणार आहे. 

व्होडाफोन-आयडिया आता आपल्या युजर्सना फ्री कॉलिंगची सुविधा देणार आहे. Vodafone Idea Limited (VIL) ने गुरुवारी (10 ऑक्टोबर) IUC संबंधीत एक मोठी घोषणा केली आहे. युजर्सना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस (IUC) लागणार नसल्याची माहिती व्होडाफोन-आयडियाने दिली आहे. कंपनीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 'व्होडाफोनवरून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाहीत. आम्ही तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्याचा आनंद घ्या. व्होडाफोन अनलिमिटेड प्लॅन्सवर फ्री कॉल' असं ट्वीट व्होडाफोनने केलं आहे. व्होडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये सुरुवातीचा प्रीपेड प्लॅन 119 रुपयांचा आहे. 28 दिवस व्हॅलिडीटी, 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा या प्लॅनमध्ये मिळते. 

रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नेहमी खास ऑफर्स आणत असतं. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक बॅडन्यूज आहे. जिओने दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम ऑपरेटर्सना आपल्या युजर्सद्वारे अन्य ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर मोबाईल फोन कॉल्ससाठी 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारले जाणार आहे. मात्र हे चार्जेस युजर्सने दुसऱ्या जिओ युजर्सला कॉल केला असेल किंवा व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य प्लॅटफॉर्मवरून कॉल केल्यास लागू होणार नाहीत. 2017 मध्ये ट्रायने इंटरकनेक्ट युसेज चार्ज (IUC) 14 पैशांवरून 6 पैसे प्रति मिनिट केले होते. तसेच जानेवारी 2020 मध्ये हे संपेल असं सांगितलं होतं. त्यानंतर आता जिओने आउटगोइंग कॉलसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचं सांगितलं आहे. 

जिओवरुन व्हाईस कॉलिंग सेवा मोफत देण्यात येत असल्याने कंपनीला आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या अर्थात भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना ट्रायच्या नियमानुसार 13, 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागत होती. त्यामुळे आता जिओने ट्रायच्या नियमांपासून वाचण्यासाठी अन्य नेटवर्कवर कॉलिंग सेवेसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. तसेच इन्कमिग सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत असणार आहे. जिओ युजर्सना जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र याची भरपाई कंपनी तेवढ्याच पैशात मोफत इंटरनेट डेटा देणार असल्याची माहिती जिओने दिली आहे.  

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओInternetइंटरनेटVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया