Reliance Jio New Plans: जिओचे ५ नवे प्लॅन्स लाँच; फुटबॉल वर्ल्डकपची मजा घेता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 10:33 AM2022-11-17T10:33:28+5:302022-11-17T10:34:08+5:30

पुढील आठवड्यात FIFA World Cup सुरु होत आहे. यासाठी जिओकडून खास रिचार्ज प्लॅन आणण्यात आले आहेत.

Reliance Jio launches 5 new plans; You can enjoy Fifa football world cup 2022 | Reliance Jio New Plans: जिओचे ५ नवे प्लॅन्स लाँच; फुटबॉल वर्ल्डकपची मजा घेता येणार

Reliance Jio New Plans: जिओचे ५ नवे प्लॅन्स लाँच; फुटबॉल वर्ल्डकपची मजा घेता येणार

Next

रिलायन्स जिओने परदेशांत फिरणाऱ्यांसाठी ५ नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. पुढील आठवड्यात FIFA World Cup सुरु होत आहे. यासाठी जिओकडून खास रिचार्ज प्लॅन आणण्यात आले आहेत. हे प्लॅन इंटरनॅशनल सर्व्हिससाठी फायद्याचे ठरतील असा दावा जिओने केला आहे. 

FIFA World Cup लाईव्ह पहायची असेल किंवा कतार, युएई आणि सौदीच्या दौऱ्यावर असताना हे प्लॅन उपयोगी पडणार आहेत. जिओने रोमिंग प्लॅन दोन कॅटेगरीमध्ये विभागले आहेत. यामध्ये डेटा, व्ह़ॉईस आणि एसएमएस पॅक तसेच वेगळे डेटा ओन्ली पॅक देण्यात आले आहेत. हे प्लॅन कतारमध्ये होणाऱ्या मॅचच्या हिशेबाने निवडता येणार आहेत. 

जिओ रोमिंग प्लॅन्समध्ये सर्वात स्वस्त डेटा, व्हॉइस आणि एसएमएस पॅक 1,599 रुपयांमध्ये येतो. या प्लानमध्ये 150 मिनिटांची व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. तसेच, 100SMS सह अतिरिक्त 1 GB डेटा दिला जात आहे. जर तुम्हाला हा प्लॅन कमी वाटत असेल तर तुम्ही 6,599 रुपयांचा प्लान घेऊ शकता. या प्लॅनमध्ये 500 मिनिटे व्हॉइस कॉलिंग, 100SMS आणि 5GB डेटा उपलब्ध आहे. जिओच्या 3,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 3GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनची ​​वैधता ३० दिवसांची आहे.

Jio चा फक्त डेटा प्लान Rs 1,122 मध्ये येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सला 1GB डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ५ दिवसांची वैधता ऑफर केली जाते. 5,122 रुपयांच्या प्लॅनमध्ये 21 दिवसांच्या वैधतेसह एकूण 5GB डेटा मिळतो.
 

Web Title: Reliance Jio launches 5 new plans; You can enjoy Fifa football world cup 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.