शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

उत्पन्नामध्ये देशातील सर्वात मोठी दुसरी कंपनी ठरली रिलायन्स जिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 5:15 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी जिओनं बाजारात येऊन अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपूर्वी जिओनं बाजारात येऊन अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जिओनं ग्राहकांसाठी नवनव्या योजना उपलब्ध करून दिल्यानं अनेक ग्राहकांच्या जिओवर उड्या पडत आहेत. त्यातच जिओ ही कंपनी नेटवर्कच्या बाबतीतही नंबर वन ठरली आहे. उत्पन्नाच्या बाबतीतही रिलायन्स जिओ इन्फोकॉम ही कंपनी देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे. महसूल बाजार हिस्सा(आरएमएस)च्या अहवालानुसार रिलायन्सनं आता व्होडाफोन इंडियाची जागा घेतली आहे. त्यातच महसुलाच्या बाबतीत रिलायन्स जिओनं व्होडाफोनला पछाडलं आहे. उत्पन्नाच्या बाबतीत भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ एकाच पातळीवर आले आहेत. देशातल्या खेड्यापाड्यात पोहोचलेल्या जिओनं ग्राहकांना फारच क्षुल्लक शुल्कामध्ये 4जी सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळेच ग्राहकांमध्ये जिओची प्रचंड लोकप्रियता वाढली आहे. तसेच दिवसेंदिवस वाढत्या ग्राहकांमुळे कंपनीलाही मोठ्या प्रमाणात फायदा पोहोचत आहे. 4जी लाँच केल्यानंतर जिओचे शेअर्स वधारलेजिओनं 4जी सेवा लाँच केल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्सनं जबरदस्त उसळी घेतली. जून 2018च्या तिमाहीत जिओचे शेअर्स 22.4 टक्क्यांवर पोहोचले होते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या माहितीनुसार, या वर्षीच्या तिमाहीच्या पहिल्या टप्प्यात शेअर्समध्ये 2.53 टक्के वाढ झाली आहे. तसेच व्होडाफोन आरएमएस जूनच्या तिमाहीच्या मुकाबल्यात 1.75 टक्क्यांची घट झाली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांच्या आयडिया सेल्युलर कंपनीमध्येही 1.06 टक्क्याची घट नोंदवली गेली आहे. एअरटेल भारतीच्या शेअर्समध्ये 0.12 टक्के घट आली आहे. आयडिया आणि व्होडाफोनचं विलीनीकरण झाल्यानंतर व्होडाफोन ही टेलिकॉम सेक्टरमधली सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर येणार आहे. आयडियाचं व्होडाफोनमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर व्होडाफोन ही नंबर वन कंपनी बनणार आहे. तर भारती एअरटेल दोन नंबरवर राहणार आहे. तसेच जिओ तिसरा क्रमांक मिळवणार आहे. 

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओJioजिओ