Redmi Note 15 5G: ६.७७-इंचाचा डिस्प्ले, १०८ MP कॅमेरा, ५५२० mAh बॅटरी; रेडमी नोट १५ 5G भारतात लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:34 IST2026-01-06T16:31:29+5:302026-01-06T16:34:56+5:30
Redmi Note 15 5G Launched in India: स्मार्टफोन जगतातील दिग्गज कंपनी शाओमीचा नवा स्मार्टफोन रेडमी नोट १५ 5G भारतात लॉन्च झाला आहे.

Redmi Note 15 5G: ६.७७-इंचाचा डिस्प्ले, १०८ MP कॅमेरा, ५५२० mAh बॅटरी; रेडमी नोट १५ 5G भारतात लॉन्च!
स्मार्टफोन जगतातील दिग्गज कंपनी शाओमीने भारतात नोट सिरीजचा नवा अध्याय सुरू केला. कंपनीचा नवा स्मार्टफोन रेडमी नोट १५ 5G भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन रेडमी नोट १४ चा अपग्रेड व्हर्जन आहे. महत्त्वाचे म्हणजे, या वर्षीचा हा कंपनीचा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे.
रेडमी नोट १५: डिस्प्ले आणि स्टोरेज
रेडमी नोट १५ मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७७-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले टीयूव्ही ट्रिपल आय केअर प्रोटेक्शनसह येतो आणि हायड्रो 2.0 टचला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम/ १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेजसह या दोन व्हेरिएंटसह बाजारात उपलब्ध झाला आहे.
रेडमी नोट १५: कॅमेरा आणि बॅटरी
रेडमी नोट १५ मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात १०८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेऱ्यासह ८ मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळता आहे. तसेच या फोनमध्ये ५५२० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी ४५ W चार्जरसह येते.
रेडमी नोट १५: किंमत आणि ऑफर्स
रेडमी नोट १५ (८ जीबी रॅम आणि १२८ जीबी) स्मार्टफोनची किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही बँक कार्डवर ३,००० च्या इन्स्टंट कॅशबॅक मिळतो.