शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

Realme ने लॉन्च केला 10,001mAh बॅटरीवाला स्मार्टफोन, एका चार्जमध्ये 39 दिवसांचा बॅकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:27 IST

जाणून घ्या या स्मार्टफोनचे फिचर्स...

भारतीय स्मार्टफोन बाजारात सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन आला आहे. चिनी स्मार्टफोन निर्माता Realme ने Realme P4 Power 5G हा नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला असून, यात तब्बल 10001mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

हा स्मार्टफोन दमदार बॅटरी, फास्ट चार्जिंग, AMOLED डिस्प्ले आणि 5G सपोर्टसह सादर करण्यात आला असून, कंपनीच्या दाव्यानुसार हा फोन सिंगल चार्जमध्ये तब्बल 39 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो.

एकाच चार्जमध्ये 39 दिवस स्टँडबायचा दावा

Realme च्या दाव्यानुसार, Realme P4 Power 5G स्टँडबाय मोडमध्ये (फोन ऑन असून वापरात नसताना) तब्बल 39 दिवस चालू राहू शकतो. मोठ्या बॅटरीमुळे हा फोन सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर स्मार्टफोन्सपेक्षा वेगळा ठरतोय. ट्रान्ससिल्व्हर, ट्रान्सऑरेंज आणि ट्रान्सब्लू अशा तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

किंमत किती?

Realme P4 Power 5G चे तीन व्हेरिएंट्स बाजारात सादर करण्यात आले आहेत... 

8GB RAM + 128GB स्टोरेज - ₹25,999

8GB RAM + 256GB स्टोरेज - ₹27,999

12GB RAM + 256GB स्टोरेज - ₹30,999

याशिवाय, फोनवर ₹2,000 पर्यंतचा बँक डिस्काउंट देखील दिला जात आहे.

हा स्मार्टफोन 5 फेब्रुवारीपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, तो Flipkart वरून खरेदी करता येईल.

Realme P4 Power 5G चे प्रमुख फीचर्स

डिस्प्ले: 6.8 इंच AMOLED

रिफ्रेश रेट: 144Hz

प्रोटेक्शन: Gorilla Glass 7i

प्रोसेसर: MediaTek Dimensity 7400 Ultra

ऑपरेटिंग सिस्टिम: Android 16 आधारित Realme UI 7.0

RAM: 8GB / 12GB

स्टोरेज: 256GB पर्यंत

कॅमेरा सेटअप

रियर कॅमेरा:

50MP प्रायमरी कॅमेरा

8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स

फ्रंट कॅमेरा:

16MP सेल्फी कॅमेरा

फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

बॅटरी: 10001mAh

चार्जिंग: 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट

इतक्या मोठ्या बॅटरीसह हा स्मार्टफोन दीर्घकाळ वापरणाऱ्या युजर्ससाठी खास ठरू शकतो.

कोणासाठी आहे हा फोन?

मोठी बॅटरी, वेगवान चार्जिंग, मोठा डिस्प्ले आणि 5G सपोर्टमुळे सातत्याने प्रवास करणारे, गेमिंग आणि कंटेंट स्ट्रीमिंग करणाऱ्यांच्यासाठी Realme P4 Power 5G हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Realme Launches 10,001mAh Battery Phone with 39-Day Backup Claim

Web Summary : Realme launched the P4 Power 5G in India, boasting a massive 10,001mAh battery. It offers 39 days of standby time, fast charging, and a 144Hz AMOLED display. Available on Flipkart from February 5th, with prices starting at ₹25,999, plus bank discounts.
टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोन