Realme Laptop First Look: रिअलमीचा पहिला लॅपटॉप लवकरच लाँच होण्याची शक्यता, फर्स्ट लूकवरून येतेय MacBook Air ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 05:12 PM2021-06-10T17:12:08+5:302021-06-10T17:14:15+5:30

Realme भारतात लवकरच लॅपटॉप लाँच करण्याची शक्यता. First Look आला समोर. 

Realme Laptop India Launch Teased May Come With MacBook Like Finish photo shared on twitter | Realme Laptop First Look: रिअलमीचा पहिला लॅपटॉप लवकरच लाँच होण्याची शक्यता, फर्स्ट लूकवरून येतेय MacBook Air ची आठवण

Realme Laptop First Look: रिअलमीचा पहिला लॅपटॉप लवकरच लाँच होण्याची शक्यता, फर्स्ट लूकवरून येतेय MacBook Air ची आठवण

Next
ठळक मुद्देRealme भारतात लवकरच लॅपटॉप लाँच करण्याची शक्यता. First Look आला समोर. 

रिअलमी (Realme) भारतात आपला पहिला लॅपटॉप लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. नुकताच याचा फर्स्ट लूक समोर आला. यावरून हा लॅपटॉपअॅपलवरून इन्स्पायर्ड झाल्याचं वाटत आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी २००८ मध्ये जसा छोट्या लिफाफ्यातून काढून MacBook Air सादर केला होता, ज्यामुळे संपूर्ण जग त्याच्या जबरदस्त लूक आणि डिझाईनवर आकर्षित झालं होतं. रिअलमी इंडिया आणि युरोपचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ब्रान्डचा पहिला लॅपटॉपचा फर्स्ट लूक सादर केला. यामध्ये लॅपटॉपचा एक छोटा भाग दाखवण्यात येणार आहे. 

सेठ यांनी प्रोडक्टच्या नावाची माहिती दिली नाही, तसंच याच्या कॅटेगरीबद्दलही सांगण्यात आलं नाही. परंतु इमेजसोबत एक बायनरी कोड दिला आहे, जो Hello World असा आहे. रिअलमीनं गेल्या काही महिन्यांपासून आपल्या लॅपटॉपच्या सेगमेंटवर काम करत आहे. दरम्यान कंपनी हा लॅपटॉप कधी आणि कुठे लाँच करणार आहे याची मात्र माहिती देण्यात आली नाही.याच्या टीझरवरून या लॅपटॉपचं डिझाईन हे MacBook Air प्रमाणे असल्याचं जाणवत आहे. रिअलमीच्या लॅपटॉपमध्ये स्लिप प्रोफाईल आहे. तसंच हा लॅपटॉप सिल्व्हर कलरमध्ये येईल हे टीझरवरून दिसून येत आहे. सध्या सेठ यांनी यासोबत कोणतीही अन्य माहिती किंवा लाँचची तारीख जाहीर केली नाही. 

Web Title: Realme Laptop India Launch Teased May Come With MacBook Like Finish photo shared on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app