ट्विटरवर आजपासून राजकीय जाहिराती बंद; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 19:51 IST2019-11-16T16:29:11+5:302019-11-16T19:51:21+5:30
मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरवर राजकीय जाहिराती आजपासून बंद होणार आहेत.

ट्विटरवर आजपासून राजकीय जाहिराती बंद; कारण...
नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरवर राजकीय जाहिराती आजपासून बंद होणार आहेत. त्यामुळे ट्विटरवर आता राजकीय जाहिराती युजर्सना दिसणार नाही. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी ट्विट करुन यासंबंधीत माहिती दिली होती.
इंटरनेटवर जाहिराती खूप ताकदवान आणि प्रभावी ठरतात. व्यावसायिक जाहिरातींपर्यंत ठिक आहे, पण ही ताकद राजकीय जाहिरातींच्या बाबतीत मोठी जोखीम ठरू शकते. राजकारणामध्ये या जाहिरातींचा उपयोग मतांवर प्रभाव पाडण्यासाठी होऊ शकतो, याचा परिणाम लाखो लोकांच्या जीवनावर होण्याची शक्यता असल्याने जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी सांगितले होते. त्यामुळे आजपासून ट्विटरवर जाहिराती बंद करण्यात आली आहे.