खुशखबर! आताच खरेदी करा 5G स्मार्टफोन फक्त 999 रुपयांमध्ये; मिळणार 50 मेगापिक्सेल कॅमेरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 03:07 PM2022-12-04T15:07:19+5:302022-12-04T15:11:12+5:30

5G तंत्रज्ञान वाढीस लागल्यानंतर 5जी फोन खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.

Poco M4 5G is now available for purchase at just Rs 999, know all the details and features | खुशखबर! आताच खरेदी करा 5G स्मार्टफोन फक्त 999 रुपयांमध्ये; मिळणार 50 मेगापिक्सेल कॅमेरा!

खुशखबर! आताच खरेदी करा 5G स्मार्टफोन फक्त 999 रुपयांमध्ये; मिळणार 50 मेगापिक्सेल कॅमेरा!

googlenewsNext

नवी दिल्ली : 5G तंत्रज्ञान वाढीस लागल्यानंतर लोकांचा चांगले आणि परवडणारे 5G स्मार्टफोन खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. कमी बजेटमुळे बरेच लोक जास्त खर्च करू इच्छित नाहीत. तुम्हाला देखील हीच समस्या सतावत असेल तर आता यावर एक तोडगा निघाला आहे. कारण Poco चा लोकप्रिय फोन M4 5G फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणला जाऊ शकतो. खरं तर Poco M4 5G Flipkart वरून सर्वोत्तम डीलवर खरेदी करता येणार आहे.

दरम्यान, पोकोच्या या 5G फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर ते 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे यावर एक्सचेंज ऑफर देखील दिली जाते. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना यावर 12,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकणार आहे. म्हणजेच सर्व सवलतींनंतर Poco चा हा फोन फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणता येईल. 

Poco M4 5G ची सर्व वैशिष्ट्ये…
Poco M4 5G मध्ये 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. हा फोन Android 12 वर आधारित असून MIUI 13 वर काम करतो. यामध्ये ड्युअल 5G सिम स्लॉट देण्यात आले आहेत. Poco च्या या हँडसेटमध्ये Mediatek Dimensity 700 प्रोसेसर उपलब्ध आहे. तसेच Poco M4 5G स्मार्टफोनमध्ये कॅमेरा म्हणून ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Poco M4 5G is now available for purchase at just Rs 999, know all the details and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.