ओपो फॅन व्हा तयार! 12GB RAM आणि 64MP कॅमेऱ्यासह येतोय OPPO K9 Pro 5G
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 19:08 IST2021-09-23T19:08:23+5:302021-09-23T19:08:52+5:30
5G Phone Oppo K9 Pro Launch: OPPO K9 Pro 5G चे अधिकृत स्पेसिफिकेशन्स लाँचच्या दिवशी समजतील. टीजर ईमेजनुसार हा फोन 64 मेगापिक्सलच्या प्रायमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

ओपो फॅन व्हा तयार! 12GB RAM आणि 64MP कॅमेऱ्यासह येतोय OPPO K9 Pro 5G
OPPO K9 Pro स्मार्टफोन लवकरच 5G Support सह सादर केला जाऊ शकतो. आता ओपोने या फोनची लाँच डेट सांगितली आहे. OPPO K9 Pro 5G Phone येत्या 26 सप्टेंबरला टेक मंचावर सादर केला जाईल. हा फोन सर्वप्रथम चीनी बाजारात लाँच होईल त्यानंतर जगभरातील बाजारपेठांमध्ये उतरवला जाऊ शकतो. चीनी शॉपिंग साइट Suning आणि JD वर या फोनचे प्रोडक्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे.
OPPO K9 Pro 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
OPPO K9 Pro 5G चे अधिकृत स्पेसिफिकेशन्स लाँचच्या दिवशी समजतील. परंतु लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार हा फोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड 11 सह कलरओएस वर चालेल. कंपनीने यात मीडियाटेक डिमेनसिटी 1200 चिपसेटचा वापर करू शकते. या फोनमध्ये 12 जीबी रॅम दिला जाऊ शकतो.
OPPO K9 Pro 5G च्या टीजर ईमेजनुसार हा फोन 64 मेगापिक्सलच्या प्रायमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. त्याचबरोबर यात 8 मेगापिक्सलचा सेकंडरी आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. ओपो के9 प्रो मध्ये 4,500एमएएचची बॅटरी मिळेल, परंतु या फोनमधील फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची माहिती अजून समोर आली नाही.