शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

OnePlus Nord 2 5G चा पहिला सेल आज; अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये मिळणार जबरदस्त डिस्काउंट 

By सिद्धेश जाधव | Published: July 26, 2021 11:26 AM

OnePlus Nord 2 5G Sale in India: OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन आजपासून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल अंतर्गत 1,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.  

OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन आज म्हणजे 26 जुलैपासून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. गेल्याच आठवड्यात हा स्मार्टफोन कंपनीने भारतात लाँच केला होता. हा फोन भारतात 3 व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे, परंतु या स्मार्टफोनचा सर्वात छोटा आणि स्वस्त व्हेरिएंट ऑगस्टमध्ये भारतात उपलब्ध होईल असे कंपनीने सांगितले आहे. किंमत आणि स्पेसिफिकेशन्स पाहता वनप्लस नॉर्ड 2 5G स्मार्टफोनला बाजारातील Poco F3 GT आणि Realme X7 Max सारख्या स्मार्टफोन्सचा सामना करावा लागले.  

OnePlus Nord 2 5G ची किंमत  

वनप्लस नॉर्ड 2 5G स्मार्टफोनचा 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 27,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे, परंतु हा व्हेरिएंट सध्या भारतात उपलब्ध झालेला नाही. या स्मार्टफोनचा 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 29,999 रुपये आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 34,999 रुपये आहे. Amazon Prime सब्सक्रिप्शन आणि OnePlus Red Cable मेंबरशिप असलेले युजर्स हे दोन्ही व्हेरिएंट Amazon आणि Oneplus.in वरून विकत घेऊ शकतात. हा फोन HDFC Bank कार्डने विकत घेतल्यास 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो.  

OnePlus Nord 2 5G चे स्पेसिफिकेशन्स  

OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन 6.43-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच कारतण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1800 पिक्सल रिजोल्यूशनसह आला आहे. या फ्ल्यूड अ‍ॅमोलेड डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90हर्ट्ज आहे. हा वनप्लस फोन अँड्रॉइड 11 आधारित ऑक्सिजन ओएस 11.3 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा डायमनसिटी 1200 एआय चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी OnePlus Nord 2 5G मध्ये एआरएम जी77 एमसी9 जीपीयू मिळतो.  

फोटोग्राफी सेगमेंट पाहता, OnePlus Nord 2 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योटिरीसाठी OnePlus Nord 2 5G मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक असे दोन्ही फीचर्स देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65W वॉर्प चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते.   

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड