वनप्लसचा नवा फोन आला, १२ वी सिरीज लाँच; किंमत कधी सत्तरावर पोहोचली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 13:37 IST2024-01-24T13:37:13+5:302024-01-24T13:37:28+5:30
वनप्लस अॅप्पल सारखाच फक्त सिरीजचा नंबर वाढवत चालला आहे. परंतु या प्रिमिअम ब्रँडच्या स्मार्टफोनमध्ये नाविण्य असे काहीच नाहीय.

वनप्लसचा नवा फोन आला, १२ वी सिरीज लाँच; किंमत कधी सत्तरावर पोहोचली....
अॅप्पलच्या पावलावर पाऊल ठेवत वनप्लसने १२ वी सिरीज लाँच केली आहे. यामध्ये कंपनीने आताचा लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट दिला आहे. याचबरोबर 6.82 इंचाचा 2K ProXDR डिस्प्ले दिला आहे.
वनप्लस अॅप्पल सारखाच फक्त सिरीजचा नंबर वाढवत चालला आहे. परंतु या प्रिमिअम ब्रँडच्या स्मार्टफोनमध्ये नाविण्य असे काहीच नाहीय. फक्त सिरीजचा नंबर आणि किंमत वाढवण्यातच कंपनी मश्गुल आहे. सॅमसंगने नुकतेच एआय फिचर फोनमध्ये दिले आहे.
किंमतीमध्ये वनप्लसने निराश केले आहे. ३०-३५ हजारांना मिळणारे वनप्लसचे फोन कधी सत्तर हजारावर जाऊन पोहोचले ते देखील कळलेले नाहीय. OnePlus चा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटचा फोन 64,999 रुपयांना मिळणार आहे. तर 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजचा फोन 69,999 रुपयांना मिळणार आहे. या किंमतीत iQOO 12, ओप्पो सारखे फोन येत आहेत, जे वनप्लसपेक्षा जास्त कॅमेरा क्वालिटी, डिस्प्ले आणि बॅटरी, प्रोसेसर देत आहेत.
वनप्लस १२ मध्ये सोनी IMX581 लेन्सचा ५० मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सोबतच 64MP ओमनीविजन OV64B टेलीफोटो सेंसर देण्यात आला आहे. 120x डिजिटल झूमही सपोर्ट करतो. 48MP Sony IMX581 अल्ट्रा-वाइड सेंसर देण्यात आला आहे. कमी प्रकाशात वनप्लसचे कॅमेरे चांगले परफॉर्म करत नाहीत. य़ात तरी वनप्लसने ही कमतरता दूर केली असेल, अशी अपेक्षा आहे. सेल्फीसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. 5400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 50W AIRVOOC वायरलेस चार्जिंग देण्यात आले आहे.