शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

OnePlus 6T Launch : आज भारतासाठी इव्हेंट; आयफोनला टक्कर पण किंमत तिपटीने कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 11:13 IST

चीनच्या OnePlus कंपनीने सोमवारी न्युयॉर्कमध्ये अखेर नवा OnePlus 6T लाँच केला.

चीनच्या OnePlus कंपनीने सोमवारी न्युयॉर्कमध्ये अखेर नवा OnePlus 6T लाँच केला. आज हा फोन भारतात लाँच होणार आहे. नव्या मोबाइल मध्ये ड्रॉप नॉच डिस्प्ले, ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरसह ड्युल कॅमेरा दिला आहे. तसेच नवी ऑपरेटिंग सिस्टिम पाय देखील देण्यात आली आहे.

कॉर्निंग गोरिला ग्लास 6, 6.4 इंचाची ऑप्टिक अॅमोल्ड स्क्रीन 19.5:9 या अस्पेक्ट रेशोसह पाठीमागे 20 आणि 16 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा दिला आहे. फेस अनलॉक फिचरसह 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरामध्ये सोनीचा IMX 371 सेन्सर वापरण्यात आला आहे. लो लाईट फोटोग्राफीसाठी फ्लॅशशिवाय चालणारे नाईटस्केप हे फिचर देण्यात आले आहे.

OnePlus 6T मध्ये 2.8GHz चा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 चा प्रोसेसर, 6 आणि 8 128 जीबी आणि 8/256 जीबी या दोन मॉडेलमध्ये उपलब्ध होणार आहे. फास्ट चार्जिंगसह 3700 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. अर्ध्या तासाच्या चार्जिंगमध्ये हा फोन दिवसभर चार्ज राहू शकतो. ऑक्सिजन ओएस अँड्रॉइड पायवर बनविण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या फोनमध्ये 64 जीबीचा पर्याय नसणार आहे. OnePlus 6T मध्ये हेडफोन जॅक नाही. मात्र, USB-C चा 3.5 एमएम जॅक अॅडॅप्टर मिळणार आहे. या फोनला आयपी रेटींग देण्यात आलेले नाही. मात्र, या फोनला हलक्या पावसात भिजल्यावर काहीही होणार नसल्याचा दावा कंपनीने करतानाच पोहतेवेळी फोन पाण्यात न नेण्याचे आवाहन कंपनीने केले आहे. 

वनप्लस 6T ची ग्लास बॉडी 40 प्रकारच्या चाचण्यांमधून गेली आहे. यामुळे सहजासहजी ती फुटणारी नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

आज भारतीयांसाठी इव्हेंटभारतात आज रात्री 8.30 वाजता दिल्लीतील केडीजीडब्ल्यू स्टेडीअमवर हा लाँचिंग इव्हेंट होणार आहे. अॅमेझॉनवर हा मोबाईल 1 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार असून आगाऊ बुकिंग सुरु आहे. 1 हजार रुपयांमध्ये बुकिंग केल्यानंतर  1500 रुपयांचा टाईप-सी बुलेट हेडफोन मोफत मिळणार आहे. तसेच 500 रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. तसेच जिओ अॅपवर 5400 रुपयांचा कॅशबॅक, सिटी आणि आयसीआयसीआय बँकेकडून 2000 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. अॅमेझॉन पेवर 1000 रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. 

या बँककडून मोफत अॅक्सिडेंटल इन्शुरन्सकोटक 811 बँकेमध्ये नवे खाते उघडल्यास वनप्लस मोबाईलसाठी 2000 रुपयांचा अॅक्सिडेंटल आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन इन्शुरन्स मिळणार आहे. नो कॉस्ट ईएमआयसाठी सर्व महत्वाच्या बँक सुविधा देणार आहेत. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलMobileमोबाइलIndiaभारतApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X