5,000 रुपयांच्या सवलतीत मिळणार OnePlus 6 स्मार्टफोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 16:17 IST2018-10-04T16:16:44+5:302018-10-04T16:17:07+5:30
One Plus चा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 6 अॅमेझॉन ग्रेट इंडिया सेलच्या दरम्यान स्वस्त मिळणार आहे. OnePlus 6 स्मार्टफोन स्वस्त मिळण्याची दोन कारणे आहेत.

5,000 रुपयांच्या सवलतीत मिळणार OnePlus 6 स्मार्टफोन
नवी दिल्ली : One Plus चा फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 6 अॅमेझॉन ग्रेट इंडिया सेलच्या दरम्यान स्वस्त मिळणार आहे. OnePlus 6 स्मार्टफोन स्वस्त मिळण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे कंपनी OnePlus 6T स्मार्टफोन लवकर लाँच करणार आहे आहे आणि दुसरे म्हणजे फेस्टिव्ह सीजन सेल असणार आहे. 10 ऑक्टोबरपासून अॅमेझॉन ग्रेट इंडिया सेल सुरु होणार आहे. तसेच हा सेल पाच दिवस चालणार आहे.
अॅमेझॉनच्या माहितीनुसार, सेलच्या दरम्यान OnePlus 6 स्मार्टफोनवर 5,000 रुपयांची सूट मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 34,999 रुपये आहे. मात्र सेलमध्ये ग्राहकांना 29, 999 रुपयांना मिळणार आहे. दरम्यान, OnePlus कंपनीने OnePlus 6 स्मार्टफोन लाँच केल्यानंतर पहिल्यांदाच इतकी मोठी सवलत देणार आहे.
OnePlus 6T स्मार्टफोन पुढील महिन्यात किंवा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनच्या लाँचनंतर कंपनी OnePlus 6 स्मार्टफोनची निर्मिती बंद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे OnePlus 6 स्मार्टफोनमध्ये सेलच्या ऑफर आणून स्टॉक संपविण्याकडे कल असल्याचे दिसून येते.
मार्केटमध्ये OnePlus 6 स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी शाओमी कंपनीने पोको एफ 1 लाँच केला आहे. पोको एफ 1 स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये OnePlus 6 स्मार्टफोनसारखा प्रोसेसर- क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 845 देण्यात आला आहे.