वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:22 IST2025-11-12T16:21:20+5:302025-11-12T16:22:22+5:30
OnePlus 15 ची किंमत लॉन्चपूर्वीच लीक झाली! Snapdragon 8 Elite Gen 5, 7300mAh बॅटरी आणि 50MP ट्रिपल कॅमेऱ्यासह या फ्लॅगशिप फोनची भारतातील अंदाजित किंमत ₹*२,९९९. लॉन्चपूर्वी संपूर्ण स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या.

वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
वनप्लस आपला बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 15 हा १३ नोव्हेंबरला भारत आणि जागतिक बाजारात लाँच करत असतानाच, त्याची किंमत आणि मुख्य स्पेसिफिकेशन्स लीक झाली आहेत. ही लीक झालेली किंमत जर खरी ठरली, तर 'नॉन-फोल्डेबल' सेगमेंटमध्ये हा वनप्लसचा सर्वात महागडा फोन ठरणार आहे.
ही लीक झालेली किंमत खरी ठरण्याची दाट शक्यता आहे. कारण दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर रिलायन्स डिजिटलने आपल्या वेबसाईटवर ही किंमत लीक केली आहे. चूक लक्षात येताच रिलायन्सने वेबसाईटवरून ते पेज हटविले असले तरी त्या पेजने आपली हिस्ट्री गुगलवर सोडली आहे. गुगलवर oneplus 15 reliance digital असे जरी सर्च केले तरी पहिल्या दोन लिंक आणि डिस्क्रीप्शनमध्ये किंमतीसह सारे काही दिसत आहे.
या लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला Oops! The page was not found असेच येणार आहे. परंतू, रिलायन्स डिजिटलने वनप्लसच्या किंमतीची उत्सुकता मात्र संपविली आहे.
बेस व्हेरिअंट: १२GB RAM + २५६GB स्टोरेज: ₹ ७२,९९९
टॉप व्हेरिअंट: १६GB RAM + ५१२GB स्टोरेज: ₹ ७९,९९९
दमदार स्पेसिफिकेशन्स
किंमत जास्त असली तरी, कंपनीने स्पेसिफिकेशन्समध्ये कोणतीही कसर सोडलेली नाही.
प्रोसेसर : यात Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 हा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर असणार आहे. त्यामुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंगचा अनुभव अत्यंत वेगवान असेल.
डिस्प्ले : ६.७८ इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले, जो १२०Hz च्या फास्ट रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल आणि त्याला गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 (Gorilla Glass Victus 2) चे मजबूत संरक्षण मिळेल.
कॅमेरा : फोटोग्राफीच्या शौकिनांसाठी यात ट्रिपल ५०MP + ५०MP + ५०MP चा रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, जो उत्कृष्ट फोटो क्वालिटी सुनिश्चित करेल. समोरच्या बाजूला ३२MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल.
बॅटरी: चीनमध्ये लाँच झालेल्या मॉडेलनुसार, यात ७३००mAh ची प्रचंड मोठी बॅटरी आणि १२०W ची फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
OnePlus 15 हा स्मार्टफोन Android 16 ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करेल, जो यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरावा आहे. उद्याच्या लाँचिंगमध्ये कंपनी या लीक झालेल्या किमतीची पुष्टी करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.