WhatsApp : आता व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवलेला मेसेजही एडिट करत येणार; हे नवं फिचर येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 03:41 PM2022-10-15T15:41:55+5:302022-10-15T15:45:16+5:30

व्हॉट्स अ‍ॅप सध्या एका नव्या फिचरवर काम करत आहे.या फिचरमध्ये एखाद्या वापरकर्त्यांने आधीच पाठवलेले मेसेज एडिट करता येणार आहे.

Now the message sent on WhatsApp will also be edited This new feature will come | WhatsApp : आता व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवलेला मेसेजही एडिट करत येणार; हे नवं फिचर येणार

WhatsApp : आता व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवलेला मेसेजही एडिट करत येणार; हे नवं फिचर येणार

googlenewsNext

व्हॉट्सअ‍ॅप सध्या एका नव्या फिचरवर काम करत आहे.या फिचरमध्ये एखाद्या वापरकर्त्यांने आधीच पाठवलेले मेसेज एडिट करता येणार आहे. आता मेसेजच्या पुढे एक एडिट असं बटन असेल, यातून वापरकर्ते मेसेज पाठवल्यानंतर १५ मिनिटांच्या आत एडिट करू शकतात. हा मेसेज काही वेळातच एडिट करता येणार आहे. नवीन एडिट फीचर ‘डिलीट मेसेज’ फीचरला पर्याय असणार आहे.

मेसेज पाठवल्यानंतर  एडिटचे बटन दिसेल. तसेच, WhatsApp तुम्हाला मेसेज एडिट करण्यासाठी १५ मिनिटे देईल. तुमचा मेसेज प्रत्यक्षात एडिट होईल की नाही हे व्हॉट्सअॅप सांगू शकत नाही. ज्याला मेसेज पाठवला आहे. त्याने त्या वेळेत त्याचे व्हॉट्सअॅप चालू केले नाही, तर तुमचा मेसेज एडिट केला जाऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅपने अद्याप या खास फीचरबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. 

भयंकर! "मी हिच्यासाठी मरत आहे"; Whatsapp स्टेटसवर प्रेयसीचा फोटो ठेवून तरुणाची आत्महत्या

मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग अ‍ॅपने आता निवडक व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी सदस्यता योजना आणण्यास सुरुवात केली आहे. हे फिचर Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप आणि गुगल प्ले स्टोअर येणार आहे. या प्लॅनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कस्टम ट्रेड लिंक बसवता येऊ शकते. या लिंकवर क्लिक करून, ग्राहकांना खरेदी करण्यासाठी वेबसाईटवर जाता येणार आहे.

आता वापरकर्त्यांना कोअर व्ह्यू-वन फॉरमॅटमध्ये शेअर केलेल्या फोटोंचे स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत. हे फिचर आता काही बीटा परीक्षकांसाठी आणले जात आहे, याची व्हॉट्सअॅपने नुकतीच घोषणा केली आहे. 

Web Title: Now the message sent on WhatsApp will also be edited This new feature will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.