ब्रिटनची कंपनी नथिंगने नुकतेच दोन स्मार्टफोन लाँच केले होते. आता नथिंगचा सब ब्रँड सीएमएफने परवडणाऱ्या किंमतीत एक स्मार्टफोन लाँच केला आहे. सीएमएफने CMF Phone 2 Pro लाँच केला आहे. हा फोन CMF Phone 1 ची पुढची पिढी आहे.
सीएमएफने या फोनच्या कॅमेरावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. या फोनमध्ये तीन लेन्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये टेलिफोटो लेन्स देखील आले. पाठीमागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या फोनला ताकद देण्यासाठी MediaTek Dimensity 7300 Pro चिपसेट वापरण्यात आला आहे. 5000mAh ची बॅटरी आणि त्यासोबत 33W फास्ट चार्जर देण्यात आला आहे.
या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, तसेच ५० मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. तसेच ८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.77-इंचाचा Flexible AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेट आहे, यामुळे या फोनवर गेम, व्हिडीओ पाहणे सोईचे आहे.
हा स्मार्टफोन व्हाईट, ब्लॅक, ऑरेंज आणि लाईट ग्रीन रंगात उपलब्ध होणार आहे. ५ मेपासून याची विक्री ईकॉमर्स वेबसाईटवर सुरु होणार आहे. CMF Phone 2 Pro च्या ८ जीबी, १२८ जीबी व्हेरिअंटची किंमत १८९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर ८/256 जीबी व्हेरिअंटची किंमत २०९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनला पुढील तीन वर्षे ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट आणि सहा वर्षे सिक्युरिटी अपडेट दिले जाणार आहेत.
तसेच या सीएमएफ फोन २ प्रोमध्ये इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर, आयपी ५४ रेटिंग, २ एचडी माईक आदी फिचर्स देण्यात आले आहेत. या फोनला वेगवेगळ्या अॅक्सेसरीजही देण्यात आल्या आहेत, त्या तुम्हाला वेगळ्या खरेदी कराव्या लागणार आहेत.