no more free calling from jio number customers will have to pay 6 paisa per minute | जिओच्या कॉलिंगसाठी मोजावे लागणार पैसे; जाणून घ्या, का आणि किती?
जिओच्या कॉलिंगसाठी मोजावे लागणार पैसे; जाणून घ्या, का आणि किती?

नवी दिल्ली - रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नेहमी खास ऑफर्स आणत असतं. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक बॅडन्यूज आहे. कारण कॉल टर्मिनेशन चार्जशी संबंधीत नियमांमुळे  जिओने आपली कॉलिंग पॉलिसी बदलली आहे. त्यामुळे आता जिओ युजर्सना जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. याआधी ही सुविधा मोफत देण्यात आली होती. टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने बुधवारी (9 ऑक्टोबर) ही घोषणा केली आहे. 

जिओने दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम ऑपरेटर्सना आपल्या युजर्सद्वारे अन्य ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर मोबाईल फोन कॉल्ससाठी 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारले जाणार आहे. मात्र हे चार्जेस युजर्सने दुसऱ्या जिओ युजर्सला कॉल केला असेल किंवा व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य प्लॅटफॉर्मवरून कॉल केल्यास लागू होणार नाहीत. 2017 मध्ये ट्रायने इंटरकनेक्ट युसेज चार्ज (IUC) 14 पैशांवरून 6 पैसे प्रति मिनिट केले होते. तसेच जानेवारी 2020 मध्ये हे संपेल असं सांगितलं होतं. त्यानंतर आता जिओने आउटगोइंग कॉलसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचं सांगितलं आहे. 

जिओवरुन व्हाईस कॉलिंग सेवा मोफत देण्यात येत असल्याने कंपनीला आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या अर्थात भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना ट्रायच्या नियमानुसार 13, 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागत होती. त्यामुळे आता जिओने ट्रायच्या नियमांपासून वाचण्यासाठी अन्य नेटवर्कवर कॉलिंग सेवेसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. तसेच इन्कमिग सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत असणार आहे. जिओ युजर्सना जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र याची भरपाई कंपनी तेवढ्याच पैशात मोफत इंटरनेट डेटा देणार असल्याची माहिती जिओने दिली आहे. 

Reliance JioFiber: केवळ 4K टीव्ही देणार; केबल कनेक्शन नाही

रिलायन्स जिओने गेल्या महिन्यात गिगा फायबर लाँच करून टेलिकॉम क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. मात्र, आता त्यातील खऱ्या बाबी बाहेर येऊ लागल्या आहेत. जिओने 699 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅनमध्ये 100 एमबीपीएसचा वेग दिला होता. याचबरोबर लँडलाईन कनेक्शनसह  4के टीव्हीही देणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता पुरती निराशा होणार आहे. मोफत टीव्ही मिळेल पण कनेक्शन मिळणार नाही. जिओ 4 के सेट टॉप बॉक्स देणार आहे. मात्र, टीव्हीवर चॅनेल पाहण्यासाठी लोकल केबल ऑपरेटर किंवा अन्य केबल ऑपरेटरचे कनेक्शन घ्यावे लागणार आहे. यामुळे 699 सह केबलसाठीचे वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत. जिओ फायबर युजरसाठी सध्या हाथवे, डेन आणि जीपीटीएल हाथवे सारखे प्रोव्हायडर केबल सर्व्हिस देत आहेत. जर तुम्हाला 4 के सेट टॉप बॉक्सवर कन्टेट पहायचा असेल तर यांच्याकडून केबल टीव्ही कनेक्शन घ्यावे लागणार आहे. 

 


Web Title: no more free calling from jio number customers will have to pay 6 paisa per minute
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.