सावधान! २०२३ मध्ये Google वर या गोष्टी करताय सर्च? खावी लागेल तुरुंगाची हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 13:25 IST2023-01-03T13:24:55+5:302023-01-03T13:25:09+5:30
गुगल म्हणजे ज्ञान देणार भांडार आहे. गुगलवर आपण जगातील काहीही सर्च केलं तर गुगल त्यावर आपल्याला उत्तर देत. आपण जगात कुठेही बसून कुठलीही माहिती फक्त एका क्लिकवर मिळवू शकतो.

सावधान! २०२३ मध्ये Google वर या गोष्टी करताय सर्च? खावी लागेल तुरुंगाची हवा
गुगल म्हणजे ज्ञान देणार भांडार आहे. गुगलवर आपण जगातील काहीही सर्च केलं तर गुगल त्यावर आपल्याला उत्तर देत. आपण जगात कुठेही बसून कुठलीही माहिती फक्त एका क्लिकवर मिळवू शकतो. पण, गुगल हा प्लॅटफॉर्म माहिती गोळा करण्यासाठी जितका सोपा आहे, तितकाच तो धोक्याचाही आहे. काही गोष्टी तुम्ही गुगलवर सर्च केल्यातर तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतो.
गुगलवर तुम्ही काहीही सर्च केले तर तु्म्ही संकटात येऊ शकता, गुगलवर काही गोष्टी संर्च करणे गुन्हा होऊ शकतो. यासाठी तुम्हाला कारागृहात जाव लागू शकते.
गुगलला नवा पर्याय? : चॅट जीपीटी
चाइल्ड क्राइम सर्च
चुकूनही गुगलवर बालगुन्हेगारीशी संबंधित माहिती सर्च करु नका. याबाबत अतिशय कडक नियम असून आयटी सेलची सतत नजर यावर असते. यासंबंधीची माहिती कोणी वारंवार मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तुरुंगात जावे लागू शकते.
बॉम्ब किंवा शस्त्र कसे बनवायचे?
गुगल सर्चमध्ये शस्त्रास्त्र आणि दारूगोळा संबंधित काही गोष्टी सर्च करु नयेत. अशा सर्च रिपोर्टची माहिती थेट सायबर सेलकडे तुमच्या नंबर किंवा ई-मेल आयडीद्वारे जाते. अशी माहिती गोळा करत असताना जर तुम्ही आढळलात तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
हॅक करण्याची पद्धत
जर तुम्ही गुगल सर्चवर हॅक कसे करायचे किंवा त्याबद्दल पुन्हा पुन्हा सर्च केले तर तुमच्यासाठी समस्या असू शकते. अशा प्रकारचे सर्च केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
हिंसा संदर्भात सर्च केल्यास
गुगल सर्चमध्ये तुम्ही हिंसेशी संबंधित सतत सर्च केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. अशा गोष्टी वारंवार सर्च करणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते.