व्हॉट्सअ‍ॅपवर बहुप्रतिक्षित कॉल वेटिंग फिचर सुरू; पण कॉल होल्ड करता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 08:55 AM2019-12-09T08:55:34+5:302019-12-09T08:56:28+5:30

युजरला दोन सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये युजर कॉलला रद्द करू शकतो किंवा पहिला कॉल बंद करून दुसऱ्या कॉलवर बोलू शकणार आहे.

much awaited call waiting feature on WhatsApp launches; But the call cannot be on hold | व्हॉट्सअ‍ॅपवर बहुप्रतिक्षित कॉल वेटिंग फिचर सुरू; पण कॉल होल्ड करता येणार नाही

व्हॉट्सअ‍ॅपवर बहुप्रतिक्षित कॉल वेटिंग फिचर सुरू; पण कॉल होल्ड करता येणार नाही

Next

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये याआधी कॉल सुरू असताना ना फोनवर ना व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला कॉल समजत होता. यामुळे मोठी अडचण होत होती. आता व्हॉट्सअ‍ॅपने कॉल वेटिंग फिचर आणत लाखो मोबाईलधारकांची समस्या सोडविली आहे. या फिचरमुळे कॉल आल्यानंतर युजरला माहिती मिळणार असून करणाऱ्यालाही बिझी टोन ऐकू येणार आहे. 


यामध्ये युजरला दोन सुविधा देणअयात आल्या आहेत. यामध्ये युजर कॉलला रद्द करू शकतो किंवा पहिला कॉल बंद करून दुसऱ्या कॉलवर बोलू शकणार आहे. पण युजरला पहिला कॉल होल्डवर ठेवता येणार नाही. म्हणजेच याद्वारे युजर ग्रुप कॉलिंग करू शकत नाही. गेल्या महिन्यात हे फिचर आयफोनसाठी आणण्यात आले होते. आता अँड्रॉईडसाठीही देण्यात आले आहे. 


अँड्रॉईड युजर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवीन अपडेट आले आहेत. बीटा आणि स्टेबल या दोन्ही व्हर्जनवर हे फिचर काम करणार आहे. 
युजर इंटरफेसवर हिरव्या रंगामध्ये ‘End & Accept' बटनासोबत लाल रंगामध्ये ‘Decline' बटन मिळणार आहे. 
नव्या अपडेटमध्ये ग्रुप प्रायव्हसी सेटिंग आणि फिंगरप्रिंट सपोर्टही देण्यात आला आहे. ही फिचर्स स्टेबल व्हर्जन 2.19.352 आणि बीटा व्हर्जन 2.19.357 किंवा 2.19.358 मध्ये देण्यात आली आहेत. 


ग्रुप सेटिंग फीचरला अपडेट व्हर्जन वापरण्यासाठी अकाऊंटमध्ये प्रायव्हसीमध्ये जात ग्रुप्स ऑप्शनवर जावे लागणार आहे. फिंगरप्रिंट लॉक फिचरला अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी सेटिंगमध्ये अकाऊंटमध्ये जाऊन प्रायव्हसी ऑप्शननंतर फिंगरप्रिंट लॉकवर क्लिक करावे लागणार आहे. 

Web Title: much awaited call waiting feature on WhatsApp launches; But the call cannot be on hold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.